आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांमध्ये धास्ती, मात्र ‘समृद्ध’चे कामकाज सुरळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डेअरी प्रकल्पात भागीदारीचे अामिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी ‘समृद्ध जीवन’चे महेश माेतेवार यांना पुण्यात पाेलिसांनी अटक केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत अाहे.

दरम्यान, शहरातील ‘समृद्ध जीवन मल्टिपर्पज काे-अाॅपरेटिव्ह साेसायटीच्या अशाेकस्तंभ अाणि गाेविंदनगरमधील दाेन्हीही कार्यालयांमध्ये कामकाज नियमितपणे सुरू असल्याचे दिसून येत असून, कार्यालयांमध्ये गर्दी करत असून, गुंतवणूकदारांना नियमितप्रमाणे पैसे दिले जात असल्याचा दावा व्यवस्थापकांनी केला अाहे.

ठेवी अद्यापही कायम : डेअरीप्रकल्पाचा अाणि मल्टिपर्पज काे-अाॅपरेटिव्ह साेसायटीचे व्यवहार स्वतंत्र अाहेत. त्यामुळे मल्टिपर्पज साेसायटीमध्ये अाम्हाला व्यवहार करताना फसवणूक हाेत असल्याचे अजिबात जाणवत नाही. त्यामुळे अाजही मी माझ्या ठेवी तशाच ठेवल्या असल्याचे अशाेकस्तंभ येथील कार्यालयात अालेले अहिरे यांनी सांगितले.

दाेन काेटींच्या वाटपाचा दावा :ठेवींची मुदत संपलेल्या गुंतवणूकदारांना नाेव्हेंबर, डिसेंबरमध्ये दाेन काेटींचे वाटप करण्यात अाल्याचा दावा अशाेकस्तंभ येथील साेसायटीच्या व्यवस्थापकांनी केला अाहे.
शहरातील ‘समृद्ध जीवन’च्या कार्यालयातील गुंतवणूकदारांची गर्दी.

अातापर्यंतचा परतावा मिळाला अाहे
^‘समृद्धजीवन’चे नाशिकमध्ये कामकाज सुरळीतपणे सुरू अाहे. प्रतिमाह ८० लाख रुपयांची दाेन्हीही कार्यालयांची उलाढाल अाहे. माझ्या १६ लाख रुपयांच्या ठेवी अाहेत. याशिवाय, अारडीएफडीमधून मला अातापर्यंतचा १८ लाख रुपयांचा परतावा मिळाला अाहे. कैलास पाटील, सभासद