आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलाई लामा यांच्या उपस्थितीत आज धर्मनिरपेक्षता नीती परिषद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंडो-तिबेटीयन मंगल मैत्री संघाच्या वतीने शनिवारी (दि. ३) पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल ज्युपिटर येथे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय धर्मनिरपेक्षता नीती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धर्मनिरपेक्षता नीतीबाबत तथागत बुद्धांचे विचार’ या विषयावर सकाळी ९.३० वाजता दलाई लामा यांचे प्रवचन होणार आहे.
सामाजिक अस्थिरता, युद्ध संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शांतता, सलोख्याचा आग्रह, समता, बंधुता स्वातंत्र्य या त्रिसूत्रीचा आग्रह धरण्यासाठी ही परिषद नाशिकमध्ये भरविण्यात आली आहे. प्रवचनानंतर दुपारी वाजता निमंत्रितांच्या उपस्थितीत परिषद होईल, तर दुपारी वाजता कमिटीच्या सदस्यांसमवेत चर्चासत्र होणार आहे. परिषदेसाठी मार्गदर्शक ग्येशे इशी ग्यालत्सेन, आयोजक टाशी डोलमा, कार्याध्यक्ष भास्करराव बर्वे, समन्वयक विश्वास देवकर अतुल भोसेकर परिश्रम घेत आहेत.