आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरणात 71 टक्‍के पाणी, ‘मुळा’त 54 टक्के साठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ या तीनही तालुक्यांत एकाच दिवसात सरासरी 50 मिमीपेक्षा पेक्षा अधिक पाऊस पडल्याने गंगापूर धरणात केवळ 24 तासांतच 3 टक्के जलसाठा वाढला आहे. त्यामुळे सध्या या धरणात 71 टक्के पाणी आहे. मागील वर्षी 26 जुलैच्या तुलनेत तब्बल 53 टक्के अधिक पाणी असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. याच धरणातून जायकवाडीत पाणी येण्याची अपेक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच 23 धरणांत 36 टक्के पाणी असून, गेल्या वर्षी 11 टक्क्यांच्या तुलनेत ही स्थितीही आनंददायी आहे.

‘मुळा’त 54 टक्के साठा
राहुरी । तालुक्यातील मुळा धरणाने शुक्रवारी दुपारी 14 हजार दशलक्ष घनफुटांचा टप्पा ओलांडला. सध्या धरणात 54 टक्के साठा आहे. दुपारी 12 वाजता पाणलोट क्षेत्रातून 13 हजार 375 क्युसेक्स आवक सुरू होती.
नगरसह राहुरी, नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुक्याला या धरणाचा लाभ होतो. भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य कायम असल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. भंडारदर्‍याचा साठा साडेसात टीएमसीवर पोहोचला, तर मुळा धरणाने 14 हजारांचा टप्पा पार केला. धरणात नव्याने 24 तासांत अर्धा टीएमसी पाणी जमा झाले.