आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील धरणातील पाण्‍याच्या पातळीत लक्षणीय घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - अपु-या पावसामुळे धरणे भरलेली नाहीत. त्यातच उष्णतेमुळे दिवसेंदिवस धरणातील पाणी आटत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस पातळीत कमालीची घट झाली असून, आगामी एप्रिल-मे महिन्यात गंभीर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. जिल्ह्यात एकूण 23 धरणे असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. सध्या 1972मधील दुष्काळाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मात्र, त्यावेळी धान्य नव्हते तर पाणी होते, आता पाणी नाही धान्य आहे, अशी परिस्थिती असल्याने उपाययोजनांवर सातत्याने चर्चा सुरू असून, सामान्यांनी परिस्थिती गांभीर्याने घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

विभागात प्रथमच 626 टँकर
मार्च अखेर जिल्ह्यातील गंगापूरसह सर्वच धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. विशेष म्हणजे प्रथमच विभागात मार्च अखेरीस 553 गावे, 1686 वाड्यांना तब्बल 626 टॅँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. नाशिक जिल्ह्यातील 147 गावे, 352 वाड्यांना 142 टॅँकर, जळगाव जिल्ह्यात 75 गावांना 67 टॅँकर्सव्दारे तर सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यात 330 गावे, 1334 वाड्यांना 416 टॅँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.