आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिकांना लाभला ‘कलानंद’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाव प्रदश्रनातील ठुमरी असो की कथकचे अनोखे रंग दश्रविणारा झपताल. बागेश्री रागातील ‘तराणा’ असो की झपतालाचे वेगळे रूप असलेला ‘सादरा’. बालिकांच्या अनोख्या पदन्यासाने कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू गाठत रसिकांना खरोखर कलानंद देत त्यांची मने जिंकून घेतली. निमित्त होते, कलानंद कथक नृत्यसंस्थेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित दोनदिवसीय नृत्य महोत्सवाच्या शुभारंभाचे. संस्थेच्या सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थिनींनी कला सादर केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पं. जसराज यांच्या संगीताने नटलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर बालिकांनी सादर केलेला पद्मजा फेणाणी यांच्या रचनेवरील नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षकांना प्रारंभापासूनच दाद देण्यास भाग पाडले. त्यानंतर तीन ताल , सावन घन गरजे, गुरुप्रणाम, झपताल, सादरा आदि कथक नृत्य व नृत्य अंगांचे दश्रन घडविणार्‍या रचना सादर केल्या.
कलानंदच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध जातींमधी कवीने प्रेक्षकांची विशेष दाद मिळविली. भाव प्रदश्रनात डगर चलत हा बिंदादीन महाराजांच्या तीन ठुर्म‍यांसहीत सादर केलेला नृत्याविष्कारालादेखील रसिकांनी भरभरून दाद दिली. बागेश्री रागातील तराणा आणि त्यानंतरच्या पदन्यासाने कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू गाठला.

कार्यक्रमाचे नृत्यदिग्दश्रन संजीवनी कुलकर्णी आणि सुमुखी अथनी यांनी केले होते. निवेदन वृषाली कोकाटे यांनी केले होते. तबल्यावर कुणाल काळे, संवादिनीवर प्रशांत महाबळ, बासरीवर मोहन उपासनी, सिंथेसायजरवर अनिल धुमाळ, तर गायनात आशिष रानडे यांनी साथसंगत केली. दरम्यान संस्थेच्या ज्येष्ठ विद्यार्थिनी शुक्रवारी ताल धमार सादर करणार आहेत. तसेच बनारस घराण्याचे युवा नर्तक आणि सितारादेवींचे नातू तसेच पं. गोपीकृष्ण यांचे पुतणे असलेले विशाल कृष्ण त्यांची कला सादर करणार आहेत.