आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरणपूर राेड भागात विवाहितेवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शरणपूर राेडवरील पी अॅण्ड टी काॅलनी भागात विवाहितेवर ताेंडाला फडके बांधलेल्या व्यक्तीने डाेक्यात लाेखंडी सळई मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि. ७) घडली. या प्रकरणी सरकारवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला असून जखमी महिलेस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्याेती जैन (३७) या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून या प्रकाराने शांत उच्चभ्रू परिसरात खळबळ उडाली अाहे. जुने पाेलिस अायुक्तालय सध्याच्या परिमंडळ एक कार्यालयासमाेरील काॅलनीत ही घटना घडली. जैन या नियमित याेग शिकण्यासाठी दत्त मंदिराच्या शेजारील सभागृहात जातात.
याेगानंतर दत्त मंदिरातून दर्शन घेऊन जैन बाहेर पडत असताना अचानक अंगात काळे जाकीट परिधान केलेल्या व्यक्तीने काही समजण्यापूर्वीच त्यांच्या डाेक्यात सळईने घाव घातला. रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या जैन यांना अाजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. संशयित काही सेकंदातच फरार हाेण्यास यशस्वी ठरला.

सदर प्रकार पाेलिसांना समजताच सरकारवाड्याचे वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम काेल्हे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जैन यांची प्रकृती चिंताजनक असून रात्री उशिरापर्यंत मारेकऱ्याचे काहीही धागेदाेरे पाेलिसांच्या हाती लागलेले नव्हते. त्याच्या शाेधासाठी पथके नियुक्त करण्यात अाले असून पाेलिस फिर्यादीसह जैन कुटुंबीयाकडे मारेकऱ्याबाबत चाैकशी करीत अाहेत. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी केली जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...