आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूरराेडच्या धाेकेदायक वृक्षांच्या पुनर्राेपणास प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूरराेड येथील धाेकेदायक ठरणारे वृक्ष हटविण्यासाठी अखेर मुहूर्त गवसला असून, पालिकेने येथील सुमारे ४२ वृक्षांचे पुनर्राेपण करण्याचे काम हाती घेतले अाहे. त्यानंतर प्राधान्यक्रमाने धाेकेदायक वृक्ष ताेडण्यास सुरुवात हाेणार अाहे.
शहरवासीयांसाठी सद्यस्थितीत धाेकादायक ठरणारे वृक्ष हटविण्याचे काम महापालिका प्रशासनाने दाेन महिन्यांपूर्वी हाती घेतले हाेते. त्या अंतर्गत रविशंकर मार्गावरील २४ वृक्षांचे पुनर्राेपण झाल्यानंतर अाता शहरातील ठिकठिकाणच्या तब्बल २५० वृक्षांचे पुनर्राेपण करण्याचे काम हाती घेण्यात येणार अाहे. जेहान सर्कल ते गंगापूरराेड या भागात तब्बल ३२० वृक्ष रस्त्यात अाणि रस्त्याच्या जवळपास अाहेत. त्यात वड, पिंपळ अाणि नांद्रुक या वृक्षांसह रस्त्याच्या बाजूची वृक्ष वगळता सुमारे २०० वृक्ष ताेडण्यायाेग्य अाहेत. या वृक्षांमुळेच अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचा अाजवरचा अनुभव अाहे. गेल्या चार वर्षांत सहा जणांना या परिसरात झालेल्या अपघातांत जीव गमवावा लागला अाहे, तर ५० पेक्षा अधिक वाहनचालक या वृक्षांमुळे जखमी झाले अाहेत. या पार्श्वभूमीवर गंगापूरराेडवरील ४२ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले अाहे.

या रस्त्यांवरही धाेकादायक वृक्ष
{ मुंबई नाका ते सीबीएस यामार्गे अशाेकस्तंभ परिसर
{ ितडके काॅलनी ते गाेविंदनगर
{ जेहान सर्कल ते बारदान फाटा
{ कलानगर ते पाथर्डी गाव
{ पेठराेड ते राऊ हाॅटेल चाैक
{ अाैरंगाबादराेड ते लक्ष्मीनारायण पूल
{ अाैरंगाबादराेड ते टाकळी एसटीपी (सायखेडाराेड परिसर)
{ नांदूर नाका ते हाॅटेल जत्रा
{ दिंडाेरीराेड ते मखमलाबादराेड
{ कॅनाॅल राेड जंक्शन ते विजय-ममता थिएटर
{ पपया नर्सरी ते गरवारे पाॅइंट