आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाॅटर प्लान्ट अाराेग्याला घातक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव- शहरातकाही वर्षांपासून त्यातही उन्हाळ्यात थंड शुद्ध पाण्याच्या नावाने झालेली पाणी विक्री म्हणजे अशुद्ध पाण्याचा धंदा ठरला असून, अशा ‘रुद्र अॅक्वा’सह अाठ प्लान्टचे पाणी अाराेग्याला घातक असल्याचा इशारा महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिला अाहे. पालिकेने पाणी तपासणी अहवाल प्रसिद्ध केल्याने याला पुष्टी मिळाली अाहे.

शहरात चार वर्षांपासून पाणीप्रक्रिया उद्याेग झपाट्याने वाढले अाहेत. गेल्या वर्षी याची पाहणी केली असता शहरात जवळच्या गावांमधून सुमारे १९ प्लान्टमधून पाण्यावर प्रक्रिया करत ते थंड मिनरल असल्याचा अप्रत्यक्ष दावा करून जारमधून वितरीत केले जात असल्याचे अाढळले अाहे. २० लिटर पाण्याचा जार घरपाेहोच ३० ते ४० रुपयाला दिला जाताे. परंतु, हे पाणी पिण्यास याेग्य असल्याची हमी काेणताही प्लान्टमालक लेखी स्वरूपात देत नाही. या पाण्याच्या काेणत्याही चाचण्या करताच ते ग्राहकांना विकले जाते.

या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने दिनांक १२ मे २०१५ राेजी सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध करीत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला हाेता. याच महिन्यात शहरात माेठ्या प्रमाणात गॅस्ट्राेची साथ अाल्याने पालिकेनेदेखील दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल घेत शहरात पाणीपुरवठा विभागाव्यतिरिक्त उपलब्ध हाेणाऱ्या पिण्याच्या पाणी स्राेतांचा शाेध घेतला. थंड पाण्याचे प्रक्रिया उद्याेग त्यांचे जलस्राेत लक्षात घेता पाण्याच्या शुद्धतेविषयी संशय बळावला हाेता. या पार्श्वभूमीवर पालिका पाणीपुरवठा विभागाने या थंड पाणी उत्पादकांच्या पाण्याचे नमुने घेतले हाेते. पाण्याचे नमुने शासकीय प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात अाले हाेते. याचा अहवाल प्राप्त झाला असून, अाठ प्लान्टचे पाणी पिण्यास अाराेग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरले अाहेत. त्यामुळे नागरिकांना ते पिण्यासाठी वापरू नये किंवा तसा वापर झाल्यास त्याला महापालिका जबाबदार नसल्याचा इशारा दि‍ला अाहे.

दूषित भूगर्भजलाचा वापर
यांचे पाणी घातक

रुद्राअॅक्वा, श्री जल, अार. अार. वाॅटर्स, मधुर अॅक्वा, राज कुल वाॅटर, नूर अार.अाे. वाॅटर, अाजाद /सैफ अार.अाे., अार. अार. वाॅटर या नावाने विक्री हाेणारे पाणी अाराेग्याला घातक असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले अाहे. िजल्हा अाराेग्य प्रयाेगशाळा नाशिक यांच्याकडे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात अाले हाेते. प्रयाेगशाळेचा अहवाल या पाण्याला अाराेग्यासाठी नाकारणारा ठरला.

तेलमाफिया ते पाणीमाफिया
गेल्याकाही वर्षांत उपलब्ध पाणी फक्त स्वच्छ थंड करून ते ‘अॅक्वा’च्या नावाने विकत काेट्यवधी रुपयांची कमाई काही उत्पादकांनी केली अाहे. यातील काहींची नावे तेलभेसळीतही अाघाडीवर हाेती. सन २००१ मध्ये भेसळीच्या तेलाने लाेकांचा बळी घेतला हाेता, तर शेकडाेंनी लाेक बाधित झाले हाेते. या वेळी जे ‘तेलमाफिया’ म्हणून चर्चेत अाले हाेते, त्यापैकी काहींनी अापल्या भ्रष्ट व्यवसायाचा घेतलेला वसा अद्याप टाकलेला नाही. गेल्या चार वर्षांपासून शाैचालयांचे अाैटलेट तसेच गटारींच्या शाेषखड्ड्यांच्या परिसरातून पाणी उपसा करीत हेच पाणी थंड करून विक्रीतून लाखाेंची कमाई साधत अाहेत. कधी काळीचे हे तेलमाफिया अाता शहरात सर्वाधिक पाणी जार विक्री करणारे ‘पाणीमाफिया’ घटकांतील माेठी हस्ती मानली जात अाहेत.

कायदेशीर अडचण
शहरातउन्हाळ्यातील चार महिने दैनंदि‍न सुमारे ४० हजार लिटर पाण्याची विक्री हाेते. परंतु, काेणत्याही पाणी जारवर त्याच्या गुणवत्तेची माहिती नसते. तसेच, ते पिण्यासाठी अाहे, असा उल्ले‌खही जाणीवपूर्वक टाळलेला असताे. या पाण्याची बि‍ले देताना त्यावर पि‍ण्याचे पाणी असा उल्लेख नसताे. अर्थात, शुद्धतेचा दावा टाळला जाताे, ही यामागची पळवाट ठेवून हे पाणी विक्री केले जाते. त्यामुळे कायदेशीर कारवाईला अडचणी येतात.

महापालिकेने बजावलेले इशारापत्रक
साेयगावचा साठ फुटीराेडदरम्यान कि‍राणा मार्केटचा परिसर कलेक्टर पट्टा या भागात गटारीच नाहीत. त्यामुळे येथे शाेषखड्ड्यांद्वारे पाणी नि‍चरा केला जाताे. अशा परिसरातूनदेखील पाणी उपसा करीत हेच पाणी शुद्धतेच्या नावाखाली वि‍कले जात अाहे. दूषित पाणीपुरवठा करणाऱ्यांमध्ये या भागातील प्लान्टचीही नावे उघड झाली अाहेत. नफेखाेरीसाठी नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा व्यापार अाजही बिनधास्त सुरू अाहे.