आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा गावठी कट्टे, काडतूससह प्राणघातक शस्त्रसाठा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात अवैध गावठी कट्टे विक्रीचे प्रकार लागाेपाठ उघडकीस येत असताना पंचवटी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल सहा कट्टे डझनभर प्राणघातक शस्त्र तर म्हसरुळ पोलिसांच्या कारवाईत जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत केले.

दरम्यान, याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात अाले अाहे. या अवैध शस्त्र विक्रीचा मास्टरमाइंड चाेपडा तालुक्यातील जिम ट्रेनर शक्तीसिंह राजपूत हा असल्याचे स्पष्ट झाले अाहे. पंचवटी पोलिस आणि पोलिस आयुक्तालयाची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने हनुमानवाडी ड्रीम कॅस्टल परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. तीन संशयित गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित शक्तीसिंह कालूसिंह राजपूत (वय २६, रा. गणदीप सोसायटी, पाथर्डी फाटा, मूळ रा. वीरवडा, ता.चोपडा, जि. जळगाव), संतोष विलास अाल्हाट (वय २३, रा. विल्हाेळी) सुनील विष्णू नागभजन (वय २५ रा. संतोषीमातानगर, सातपूर) यांना अटक केली. संशयितांच्या अंगझडतीमध्ये सहा गावठी कट्टे काडतूस अशी सुमारे लाख २६ हजार रुपये किमतीचे हत्यार अाढळून आले. पथकाने केलेल्या इतर कारवाईत दशरथ बाळू ठमके (वय २५, रा. अवधूतवाडी), प्रकाश देवराम खांदवे (वय २५ , रा. गौरी पटांगण) या सराईत गुन्हेगारांकडून तलवारी, कोयते, चॉपर, चाकू असे डझनभर प्राणघातक हत्यारे मिळाली. पेठरोड सिग्नलच्या केबल वायर चोरी करणारा संशयित अंकुश अरुण शिंदे (रा. अंबिकानगर झोपडपट्टी) यास ताब्यात घेत त्याच्याकडून ८० हजारांची केबल वायर हस्तगत करण्यात आली. घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयितास अटक करून त्याच्याकडून लाख ५५ हजारांचा मुद्देमाल, दोन पल्सर जप्त करण्यात आल्या.

म्हसरुळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत संदीप अशोक लाड, मंगल मिस्तरी शिंदे (दोघे रा. भराडवाडी, पंचवटी) यांच्याकडून जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र पिंगळे, गणेश गिरी, यवाजी महाले, प्रशांत वालझाडे, उत्तम पवार, सोमनाथ शार्दूल, नीलेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चाेपडा येथील जिम ट्रेनर मुख्य सूत्रधार
याशस्त्र विक्रीचा मास्टरमाइंड संशयित शक्तीसिंह राजपूत (रा. पाथर्डी फाटा) हा अाहे. राजपूत हा चोपडा तालुक्यातील एका जिमचा ट्रेनर आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले. पोलिसांनी चोपडा येथे केलेल्या कारवाईनंतर त्याच्या पत्नीला हा प्रकार समजला. उच्च राहणीमान असल्याने कोणासही त्याचावर संशय येत नव्हता.

मोक्का संशयिताची कार बेळगावातून जप्त
पंचवटी परदेशी गँगचा मुख्य सूत्रधार राकेश कोष्टी याची लाख किमतीची एमएच १५ ईपी २२८० ही स्विफ्ट कार पथकाने बेळगाव (कर्नाटक) येथे एका संशयिताकडून ताब्यात घेतली. मात्र कोष्टीला पकडण्यात पथकाला अपयश आले.

पंचवटी पाेलिस पथकाचा सत्कार
धडाकेबाजकारवाई करणारे पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, सुनील पुजारी, महेश इंगोले, प्रवीण कोकाटे, विजय गवांदे, भास्कर गवळी, सुरेश नरवाडे, महेश साळुंके, सचिन म्हसदे, मोतीराम चव्हाण, संदीप शेळके, संतोष काकड, प्रभाकर पवार, सतीश वसावे, भूषण रायते यांच्या पथकाचा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, उपआयुक्त दत्तात्रेय कराळे, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, विजय पाटील, सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, राजू भुजबळ, सचिन गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोठी टोळी लवकरच उघडकीस
शहरात कुठेही गैरप्रकार होत असल्यास तत्काळ पोलीसांना कळवा. तत्काळ सुमोटो अॅक्शन घेत कारवाई केली जाईल. शस्त्र विक्री करणाऱ्या मोठ्या टाेळीचे धागेदोरे हाती लागले आहेत. लवकरच ही टोळी जेरबंद केली जाईल. पंचवटी पाेलिस पथकाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. जीव धोक्यात घालून पथकाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला. - डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...