आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगद्याच्या सद्यस्थितीबाबत पोलिस आयुक्त अंधारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पोलिसांनीबंद केलेल्या इंदिरानगर बोगद्याच्या सद्यस्थितीबाबत खुद्द पोलिस आयुक्तांनाच अंधारात ठेवण्यात अाले असल्याचे स्पष्ट झाले अाहे. महापौरांसह नगरसेवकांच्या बैठकीत पोलिस आयुक्तांनी एकेरी मार्ग तत्काळ दुहेरी करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही मार्ग एकेरीच ठेवण्यात आला असल्याने वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आयुक्तांची दिशाभूल होत असल्याचेही दिसत अाहे.
बोगदा पोलिसांनी बंद केल्यानंतर या मनमानीविरोधात स्थानिकांसह लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले. आंदोलन करण्यात अाले. अधिसूचनेप्रमाणे वाहतूक विभागाने बोगदा बंद करत दोन्ही समांतर रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू केली. त्याविरोधात महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी समांतर रस्ते दुहेरी वाहतुकीसाठी खुले करण्यासह बोगदा पादचाऱ्यांसाठी सुरू करण्याचे अाश्वासन दिले. मात्र, दुहेरी मार्ग सोडाच, वाहतूक पाेलिस विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी बोगदाही िसमेंट पिलरने बंद केला. शिवसेना, ‘अाप’ स्थानिक रहिवाशांनी त्याविराेधात आंदोलन केले. बंद बोगदा दुहेरी मार्गाबाबत पोलिस आयुक्तांना व्यवस्थित माहितीच नसल्याचे दिसत अाहे. वाहतूक विभागाचे उपआयुक्त, सहायक आयुक्त वरिष्ठ निरीक्षकांकडून आयुक्तांची दिशाभूल होत असल्याचे बाेलले जात अाहे. सिंहस्थ नियोजनात व्यस्त आयुक्तांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांकडून होत असल्याची चर्चा पोलिस विभागातच होत आहे.

"आप'कडूनजनजागृती. पान
वाहतूक विभागाचे अधिकारी जबाबदार
वाहतूकविभागाच्या अधिकाऱ्यांकडून आंदोलन, मोर्चे आणि स्थानिकांच्या मागण्या या बाबींची माहिती आयुक्तांना दिली जात नाही. बंद बोगद्याचा वाद वाढण्यास वाहतूक विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
बोगदा बंद केल्याची कल्पनाच नाही
बोगदापादचाऱ्यांसाठी बंद केला, याची कल्पनाच नाही. दोन्ही बाजूच्या समांतर रस्त्यांवर दुहेरी वाहतूक करण्याचे आदेश होते. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. एस.जगन्नाथन, पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...