आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दस-याला 100 कोटींची उलाढाल, होमअ‍ॅप्लायन्सेस दालनांतही मोठी खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विजयादशमीच्यामुहूर्तावर शहरवासीयांनी अस्सल सोने तर लुटलेच; शिवाय आठशे कार दाेन हजारच्या आसपास मोटारसायकलींची खरेदी केली. नवरात्रोत्सवापासून सुरू झालेल्या उत्सवपर्वात वाहन विक्रीने टॉप गियर टाकल्याचे वितरकांनी सांगितले. सराफी पेढ्यांतील उत्साह अक्षरश: ओसंडून वाहताना पाहायला मिळाला.
सोन्याचा भाव २७ हजारांच्या आसपास प्रतिदहा ग्रॅमकरिता राहिला. रिअल इस्टेटमध्येही पुन्हा तेजीचे तोरण या मुहूर्ताच्या निमित्ताने बांधले गेले असून, १२५ फ्लॅटची नोदणी झाल्याचे क्रेडाईने स्पष्ट केले. होमअ‍ॅप्लायन्सेसच्या दालनांतही खरेदी झाल्याने विजयादशमीच्या मुहूर्तावर किमान शंभर कोटींची उलाढाल झाल्याचा व्यावसायिकांचा अंदाज आहे.
वाहनिडलिव्हरीसाठी गर्दी
गणेशोत्सवापासूनचबाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले असून, त्याचा अत्युच्च कळस ग्राहकांच्या उत्साहातून शुक्रवारी शहरात पाहायला मिळाला. अनेक दालनांत आपल्‍या नोंदणी केलेल्या वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आणि व्यवस्थापनाची उडालेली धावपळ हे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळाले. दिवसभरात सर्वच प्रमुख कंपन्यांच्या दालनांतून ७०० च्या आसपास कार, तर दोन हजारच्या आसपास मोटारसायकलींची डिलिव्हरी दिली गेली.
सराफीपेढ्या झळाळल्या :नवरात्रोत्सव प्रारंभ झाल्यापासूनच सराफी पेढ्यांत ग्राहकांकडून मनसोक्त खरेदी सुरू होती; मात्र दस-याच्या मुहूर्तावरची खरेदी म्हणून पेढ्यांत प्रचंड गर्दी अनुभवायला मिळाली. वेढे, बिस्कीट, नाणे, दागिने यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली.