आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या नवलाईचं लेणं लेवून अाला दसरा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नव्यानवलाईचं लेणं लेवून बाजारावरील दुष्काळाचे सावट दूर करीत अालेल्या दसऱ्याने बाजारात नवचैतन्य निर्माण केले अाहे. महानगरातील सर्व प्रमुख दालने बाजारपेठा या चैतन्य साेहळ्यासाठी सजल्या असून, गुरुवार (दि. २२)च्या शुभ मुहूर्तावर बाजारात काेट्यवधींची उलाढाल हाेण्याची चिन्हे अाहेत.

हिंदू संस्कृतीनुसार शुभ कार्यासाठी जे साडेतीन मुहूर्त सर्वाेत्तम मानले जातात, त्यापैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱ्याचा उत्साह बुधवारपासूनच सर्वत्र दिसू लागला अाहे. अल्पशा पावसामुळे बाजारावर पसरलेले मंदीचे सावट त्यामुळे काही प्रमाणात तरी दूर हाेण्यास मदत मिळणार अाहे. बहुतांश मल्टिनॅशनल कंपन्या, तसेच बाजारपेठेतील सर्व प्रमुख दालनांमध्ये अाकर्षक अाॅफर्सद्वारे ग्राहकांना अाकर्षित करण्याची जणू स्पर्धाच लागलेली अाहे. दसऱ्याच्या दिवसभरात अनेक फ्लॅटचे बुकिंग हाेण्याची चिन्हे असून, वाहन, सराफ, कपडा बाजार, माॅल्स, तसेच इलेक्ट्राॅनिक्स मार्केटमध्येही उत्साहाचे वातावरण पसरलेले अाहे.

झेंडूच्या फुलांमुळे बहर
गर्द केशरी अन् पिवळ्याधमक झेंडूच्या फुलांनी शहरातील मुख्य बाजारपेठा बुधवारीच फुलून गेल्या हाेत्या. ही फुले ७० ते ९० रुपये शेकडा दराने उपलब्ध हाेती. विक्रेत्यांनी दिंडाेरीराेडपासून थेट रविवार कारंजापर्यंत अन्यत्रही दुकाने थाटल्याने शहरात जणू केशरी-पिवळी रांगाेळीच घातल्याचा अाभास हाेत हाेता.