आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयादशमीचा मुहूर्त अन‌् खरेदीचा उत्साह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हिंदू धर्मशास्त्रा नुसार एक पूर्ण मुहूर्त म्हणून विशेष महत्त्व असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर शहरवासीयांनी अस्सल सोने तर लुटले. गतवर्षापेक्षा कारच्या विक्रीत सरासरी २० टक्के वाढ नोंदवली गेली असून, एक हजारावर कार, तर चार हजारच्या आसपास मोटारसायकल्सची डिलेव्हरी घेत कथित मंदीचे सीमोल्लंघनही केले. गणेशोत्सवापासून सुरू झालेल्या उत्सवपर्वात वाहन विक्रीने टॉप गियर टाकल्याचे वितरकांनी सांिगतले. सराफी पेढ्याही झळाळलेल्या पाहायला मिळाल्या. आकर्षक ऑफर्स आणि ३० हजारांच्या आसपास प्रति दहा ग्रॅमकरिता सोन्याचे भाव होते. रिअल इस्टेटमध्येही पुन्हा एकदा चैतन्याचे तोरण या मुहूर्ताच्या निमित्ताने बांधले गेले.
वाहनवितरकांकडे डिलेव्हरीसाठी गर्दी : नवरात्राेत्सवाच्यासुरुवातीपासूनच वाहन बाजारात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक दालनांत नोंदणी केलेल्या वाहनांची डिलेव्हरी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आणि व्यवस्थापनाची धावपळ हे िचत्र अनेक दविसांनंतर पाहायला मिळाले. दिवसभरात सर्वच प्रमुख कंपन्यांच्या दालनांतून एक हजाराच्या आसपास कार, तर चार हजारच्या आसपास माेटारसायकल्सची डिलेव्हरी दिली गेली.
सराफीपेढ्या झळाळल्या : नवरात्रोत्सवप्रारंभ झाल्यापासूनच सराफी पेढ्यांत ग्राहकांकडून मनसोक्त खरेदी सुरू होती, मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावरची खरेदी म्हणून पेढ्यांत प्रचंड गर्दी अनुभवायला मिळाली. वेढे, बिस्कीट, नाणे, दागिने यांची खरेदी माेठ्या प्रमाणावर झाली. आकर्षक ऑफर्स, घडणावळीवरील ऑफर्स आणि ३० हजारांच्या आसपासपर्यंतचे दर याचा ग्राहकांनी पुरेपूर फायदा घेतल्याचे दृश्य सगळीकडे होते.
रिअलइस्टेटमध्ये चैतन्य :रिअलइस्टेटमध्येही चांगले वातावरण तयार झाले असून, बँकांनी गृहकर्जाच्या दरात केलेली कपात आणि स्थरि असलेले दर यामुळे ही सकारात्मक परिस्थिती दिसून येत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. किमान ५० फ्लॅट मुहूर्तावर नोंदणी केल्याने नवरात्राेत्सवातच बांधकाम व्यवसायातही काेट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. प्लाॅट, फ्लॅट, व्यावसायिक गाळे यांची खरेदी-विक्री आणि बुकिंग यांसारख्या व्यवहारांसह गृहप्रवेश करण्यासाठी अनेकांनी आजचा मुहूर्त निवडल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

२०७ कारची डिलेव्हरी
दविसभरातआम्ही२०७ कारची डिलेव्हरी केली, अत्यंत चांगले वातावरण बाजारात पाहायला मिळत असून, मारुतीसह इतर कंपन्या मिळून िकमान एक हजाराच्या आसपास कारची डिलेव्हरी झाली आहे. गतवर्षापेक्षा ही वाढ २० टक्के आहे. -राजेश कमाेद, मुख्य कार्यकारी अधिकारी, नामांकित कार विक्री दालन

पन्नासवर फ्लॅटची झाली नोंदणी
^दसऱ्याच्यामुहूर्तावरकमिान पन्नासवर फ्लॅटची बुकिंग झाल्याची चिन्हे आहेत. सुमारे २५ काेटींच्या आसपास उलाढाल झाली. बांधकाम क्षेत्रात या मुहूर्तावर चैतन्याचे वातावरण असून, ग्राहकांची संख्याही गृहप्रकल्पांवर चैाकशीसाठी वाढत आहे.- सुनील काेतवाल, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक
सराफी पेढ्यांवर सोने खरेदीसाठी मंगळवारी गर्दी होती.

दसरा-दविाळी एकाच महिन्यात
दसराआणि दविाळी एकाच महिन्यात, तर एेन वेतन मिळण्याच्या वेळेत आणि दविाळीचा बाेनस हाती पडण्याच्या काही दिवस आधीच आलेला दसरा, हाती पडणार असलेला सातवा वेतन आयाेग या बाबींचा सकारात्मक परिणाम बाजारावर पाहायला मिळाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...