आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामकुंड परिसरात रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; पंचवटी कारंजा परिसरातून मिरवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जयश्रीराम... पवनपुत्र हनुमान की जय.... असा जयघोष करत, वानर सेनेत रावण सैनिकांत होणारे युद्ध....फटाक्यांची आतषबाजी असा वातावरणात वाईट गोष्टींचा नाश होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, अशी प्रार्थना करत रामकुंड परिसरात रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते दहन करण्यात आले.

चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने दरवर्षी रामकुंड परिसरात रावणदहन करण्यात येते. यानिमित्त चतु:संप्रदाय येथून वाजतगाजत राम, लक्ष्मण, हनुमान यंाची वेशभूषा परिधान करत मंगळवारी (दि. ११) मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पंचवटी कारंजा परिसरातून नेत रामकुंडावर आणण्यात आली. त्यानंतर रामकुंड येथे वानरसेना रावणाच्या सेनेत युद्ध खेळविण्यात आले. यावेळी लहान मुलांनी केलेल्या वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यानंतर सायंकाळी ७.३० च्या सुमारास पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, आमदार बाळासाहेब सानप, चतु:संप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास, भक्तिचरणदास आदी मान्यवरांच्या उपस्थित रामकुंड परिसरात उभारलेल्या ४० फुटी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. रावणदहन बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनेगर्दी केल्याने रामकुंड गोदाकाठ परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गर्दीच्या नियंत्रणासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तुळजाभवानी मंदिर परिसरात रावणदहन :
गंगापूररोडवरीलतुळजा भवानी मंदिर परिसरात रावणदहनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ढाेल-ताशांनी परिसर दणाणून गेला होता. यंदा ५५ फूट उंचीचा रावणाचा पुतळा तयार करण्यात आला होता. या पुतळ्यात एलईडी दिवे लावण्यात आले होते. मुकुट आणि डाेळ्यांना एलईडी दिवे लावण्यात आल्याने पुतळा लक्षवेधी ठरत होता. यावेळी आमदार सीमा हिरे, महेश हिरे, याेगेश हिरे, विजय पाटील, अविनाश ढाेली, समीर माेरे, संदीप थेटे, नितीन काेचर आदी उपस्थित होते. रावणदहन बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी माेठ्या संख्येने गर्दी केली होती. गर्दीमुळे तुळजा भवानी मंदिर परिसरातील मैदानही अपुरे पडल्यासारखे जाणवत होते.
बातम्या आणखी आहेत...