आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये डाटा एंट्री कामाद्वारे 16 लाखांची फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक- डाटा एंट्रीचे काम देण्याचा करार करून नाशिक येथील एका कंपनीस सुमारे 16 लाखांना दिल्ली येथील कंपनीने गंडा घातला. या प्रकरणी कंपनीच्या वतीने न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या 156/3 आदेशान्वये सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथील एका प्रतिष्ठित कंपनीला दिल्ली येथील बॅरन टेक्नॉलॉजी या कंपनीने डाटा एंट्रीचे काम देण्याचा करार करून अनामत रक्कम आणि कामाचे थकीत बिल अशी सुमारे 18 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी कंपनीच्या वतीने न्यायालयात दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने याप्रकरणी 156/3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर मंगळवारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिल्ली येथील फसवणूक करणार्‍या कंपनीच्या मालक नीरज सैनी, सुमित अग्रवाल आणि विजय तिघांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी कंपनीतर्फे अँड. राहुल पाटील यांनी युक्तिवाद केला.

अशी झाली फसवणूक
नाशिक येथील कंपनीला 18 ऑगस्ट 2011 ला संशयित विजय याच्या इ-मेलद्वारे माहितीपत्रक आणि करार फॉर्म पाठवण्यात आला होता. डाटा एंट्रीचे काम करण्यासंदर्भात विचारणा केली. मेलद्वारे करारावर सह्या करण्यात येऊन बॅरेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यात कराराची अनामत रक्कम 1 लाख 86 हजार रुपये भरणा करण्यात आला. करारान्वये कामाच्या मोबदल्यात एक पानाचे 22 रुपयेप्रमाणे असे सुमारे 15 लाख 76 हजारांचे बिल थकवण्यात आले. कंपनीमध्ये फोनद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला. फोन बंद आढळला. कंपनीच्या सदस्यांनी दिल्ली येथे जाऊन चौकशी केली असता, अशी कंपनी अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले.