आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचा दत्तू भाेकनळ रिअाे अाॅलिम्पिकसाठी पात्र, अवघ्या चार वर्षांत गाठले शिखर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमधील चांदवड तालुक्यातील तळेगावच्या दत्तू भाेकनळ या युवकाने राेइंगच्या सिंगल स्कल प्रकारात थेट रिअाे अाॅलिम्पिकमध्ये पात्र हाेण्याची कमाल करून दाखवली अाहे. दक्षिण काेरियात चमकदार कामगिरी करीत अाॅलिम्पिकमध्ये धडक मारल्याने यंदाच्या अाॅलिम्पिकमध्ये कवितापाठाेपाठ नाशिकच्या अजून एका युवकाला सहभागाची संधी प्राप्त झाल्याने नाशिकच्या शालेयशिक्षणानंतर थेट सैन्यात : दत्तूनेदहावीपर्यंतचे शिक्षण तळेगावच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयातच घेतले. खेळण्याकडे त्याचा जास्त अाेढा हाेता. वडील अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्या काेरडवाहू शेतीवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत हाेता. त्यातच २०१२ मध्ये दत्तूचे वडील वारल्याने त्याच्या कुटुंबावर अाकाशच काेसळले. कुटुंबातील कर्ता मुलगा असल्याने सर्व घराची जबाबदारी त्याच्यावरच हाेती. त्याचवेळी सैन्यभरतीची जाहिरात निघाल्याने थेट सैन्यात दाखल हाेऊन कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली.
अाईची तब्येत नाजूक : दत्तू अाॅलिम्पिक पात्रतेसाठी दक्षिण काेरियाला रवाना झाल्यानंतर त्याच्या अाईला अपघात झाल्याने त्यांना दवाखान्यात अॅडमिट करण्यात अाले अाहे. या अपघातात त्यांच्या मेंदूला दुखापत झाल्याचे कळल्याने दत्तू खूप अस्वस्थ झाला हाेता. मात्र, कुटुंबीयांसह त्याच्या प्रशिक्षकांनीदेखील अाॅलिम्पिक पात्रतेचे ध्येय पूर्ण करूनच अाईला भेट, तिला तुझे यश बघायला अावडेल, असा सल्ला दिल्याने दत्तूनेदेखील निर्धाराने खेळावरच लक्ष केंद्रित करीत इतकी माेठी मजल मारली.

२०१२ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सैन्यात दाखल झाल्यानंतर त्याच्या शरीरयष्टीला साजेशा असलेल्या ‘नाैकानयन’ अर्थात राेइंग या प्रकारात त्याने अवघ्या वर्षभरात कमालीचे काैशल्य प्राप्त केले. राेइंग फेडरेशन अाॅफ इंडियाने भरवलेल्या राष्ट्रीय नाैकानयन स्पर्धेत पहिल्याच वर्षी त्याने पदक पटकावले. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षीदेखील दत्तूने सुवर्णपदकाची कामगिरी करीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. द्राेणाचार्य पुरस्कार विजेते इस्माईल बेग यांच्या मार्गदर्शनामुळे दत्तूचा खेळ अधिकच बहरला. पुण्यातील सैन्यदलाच्या क्लबवर मग ताे अधिकच उत्साहाने सराव करू लागला. त्यानंतर चीनमध्ये झालेल्या अाशियाई स्पर्धेत २०१४ मध्ये राैप्यपदकाची कमाई करीत पुढचे ध्येय निश्चित केले. सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेले प्राेत्साहन अाणि पाठिंब्याला त्याने प्रचंड कष्टाची जाेड देत त्याच्या कामगिरीचा अालेख उंचावता ठेवला अाणि खेळायला प्रारंभ केल्यानंतरच्या अवघ्या वर्षांच्या काळात दत्तूने थेट अाॅलिम्पिकच्या पात्रतेचे शिखर गाठण्याचा पराक्रम करून दाखवला अाहे.
दत्तू २०१२ मध्ये सैन्यदलात सहभागी झाला. ताेपर्यंत त्याला राेइंगची माहितीदेखील नव्हती. मात्र, सैन्यदलात स्ट्रेंग्थ टेस्टमध्ये खांद्याची अाणि हातांची विशेष ताकद तसेच नाैकानयनपटूला हवे तसेच ‘फिजीक’ या बाबी हेरून त्याला हा खेळ निवडण्याची संधी मिळाली. त्यानंतर अवघ्या चार वर्षांत दत्तूने राष्ट्रीय अाणि अाशियाईच्या पदकांसह थेट अाॅलिम्पिकच्या पात्रतेचे शिखर गाठले.

चांदवड हा मुळात दुष्काळी तालुका म्हणून अाेळखला जाताे. त्यामुळे जिथे दरवर्षी पिण्याची पाण्याची भ्रांत पडते, तिथे एखादा पाण्याशी निगडित खेळाचा अाॅलिम्पिकपटू घडू शकेल, ही कल्पना कुणीही करू शकत नाही.

काेरियातील या स्पर्धेची फायनल साेमवारी अाहे. त्या फायनलचा निकाल काहीही लागला तरी दत्तूने त्यापूर्वीच अाॅलिम्पिक पात्रता गाठली असून, त्याबाबतची अाैपचारिक घाेषणा साेमवारी हाेण्याची शक्यता अाहे. दत्तूच्या या अफलातून कामगिरीमुळे क्रीडा विश्वदेखील चकित झाले अाहे.