निफाड - मुलीचं लग्न म्हटलं की वधुपित्याच्या कपाळावर आठ्या येतात. किती खर्च आणि तो कसा भागवायचा असा प्रश्न पडतो. काही आई-वडील असेही असतात जे मुलीच्या आनंदासाठी काहीही करायला तयार होतात. असेच आई-वडील निफाडमधील उगावखेडेच्या सुरेखाला लाभले. मुलीची पाठवणी त्यांनी थेट हेलिकॉप्टरने केली तर, नवरदेवाची वरात सजवलेल्या गजराजावरुन काढली.
उगावखेडेचे शेतकरी पंडित महाले यांची कन्या सुरेखा आणि चांदवडमधील नन्हावे येथील सागरच्या लग्नाचा शाही थाट पाहाण्यासाठी पंचक्रोशीतून लोक आले होते. केवळ पाठवणीसाठी हेलिकॉप्टर आणि हत्तीवरुन मिरवणूक एवढाच या लग्नाचा थाट नव्हता तर, ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, रस्त्यावर सडा - रांगोळी, फुलांचा वर्षाव आब्दागिरी, मावळे आदी साज श्रृगांर देखील होता. लग्नात नवरीच्या करवलींचाही थाट पाहाण्यासारखा होता.
पंडित महाले हे शेतकरी असून त्यांनी मुलीचे लग्न शाहीथाटात करण्याचा निश्चय केला होता. त्यांनी मुलीला बी.ई. कॉम्प्युटर केले. त्यांचा जावई देखील पुणे येथे आयटी इंजिनिअर आहे. महाले आणि नवरदेवाचे वडील शिवाजी ठाकरे म्हणाले, पैशांचा माज नाही तर आम्हाला लग्न शाहीथाटात करुन कायम सर्वांच्या स्मरणात राहील असे करायचे होते.
शहरातून आलेल्या सुरेखाच्या मैत्रिणी आणि सागरच्या मित्रांनी शाही लग्न आम्ही टीव्हीमध्येच पाहिली होती मात्र, सुरेखा आणि सागरने त्याचा प्रत्यक्ष अनुभव करुन दिल्याची प्रांजळ कबुली दिली.
किती आला खर्च
नवरदेवाच्या हत्तीवरुन शाही मिरवणुकीसाठी 25 हजार रुपये आणि पाठवणीसाठीच्या हेलिकॉप्टरसाठी तीन लाख रुपये खर्च आला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, या शाही विवाह सोहळ्याची आणखी छायाचित्रे....