आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाइन लुटीला मिळतेय मोकळे रान, अद्याप सक्षम यंत्रणाच कार्यान्वित नाही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅलो.. नमस्कार.. आपले खाते आमच्या बँकेत असून, तुमचे एटीएम कार्ड अपडेट करायचे आहे, तुमचा बँक खाते क्रमांक त्वरित द्या अन्यथा एटीएम सेवा खंडित होऊ शकते.. तुमच्या मोबाइलच्या इंटरनेट डेटा अपडेशनसाठी हा कॉल आहे. त्यासाठी तुमचा फोन पुढचे दोन तास बंद ठेवा, असे फोन करून लाखो रुपयांना गंडा घालण्याचे प्रकार अलीकडे वाढत आहेत. एकीकडे बनावट कॉलद्वारे फसवणुकीचे प्रकार शहरात वाढत असतानाच दुसरीकडे असे प्रकार रोखण्यासाठी पोलिस वा बँक व्यवस्थापनाकडून मात्र कोणतीही कठोर पावले उचलली जात नसल्याचे दिसून येते. नाशिकमधील जुना गंगापूर रोड येथे राहणाऱ्या केशव बाळासाहेब येवले या व्यक्तीला तब्बल पन्नास हजार रुपयांना फसवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, या अशा अनेक प्रकरणांकडे होणाऱ्या दुर्लक्ष वा बेफिकिरीवर ‘डी.बी. स्टार’चा लाइव्ह प्रकाशझोत...
आजपर्यंत तुमच्या इमेलवर अनेक वेळा, ‘तुम्हाला लाखो डॉलर्सचे बक्षीस लागले आहे’ किंवा ‘तुम्ही अमुक स्पर्धा जिंकली असून, तुमची खासगी माहिती आम्हाला इमेल करा' किंवा अमुक खात्यात पैसे भरा, असे सांगून लुटण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, आता बँकेमधून बोलतोय, तुमचा खाते क्रमांक आणि पासवर्ड त्वरित सांगा, एटीएम कार्ड अपडेट करायचे आहे, असे फोन सर्रासपणे येऊ लागले आहेत. जुना गंगापूरनाका, गंगापूररोड येथे राहणाऱ्या केशव बाळासाहेब येवले यांना १२ मे रोजी आयसीआयसी बँकेतून बोलत असल्याचा फोन आला. खाते नंबर सांगत फोनवरील अज्ञात व्यक्तीने येवले यांच्या एटीएमकार्डची मुदत संपल्याचे सांगितले. तुमच्या मोबाइलवर आम्ही एक मॅसेज पाठवला असून, त्यामधील पासवर्ड सांगा तुमच्या एटीएमकार्डची मुदत त्वरित वाढवून देतो, अन्यथा १५ मिनिटांत आपले खाते बंद होईल तुम्हाला दंड भरावा लागेल असे सांगतो, त्यामुळे येवले यांनी त्वरित आलेला मॅसेज वाचून त्यामधील अंकी क्रमांक सांगितला. त्यानंतर लगेचच फोन बंद झाला आणि बँक खात्यातून ५० हजार रुपये विड्रॉल झाल्याचा येवले यांना मोबाइलवर मॅसेज आला. त्यामुळे गोंधळून गेलेल्या येवले आणि लगेचच आयसीआयसीआय बँकेचे कार्यालय गाठले. मात्र, आम्ही कोणताही फोन केलेला नसून बँक असे खाते क्रमांक, त्याचा पासवर्ड, आणि एटीएम बंद होणार आहे, असे कॉल कधीच करत नसल्याचे बँकेने स्पष्ट केले. आपली फवसणूक झाल्याचे लक्षात येताच येवले यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यामुळे चक्रावलेल्या परिस्थितीत येवले यांनी त्वरित गंगापूरराेड पाेलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार कथन करीत तक्रार दाखल केली.
- बनावट फोन कॉल्सद्वारे बँक ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे?
सध्या फेक कॉलचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, असे कॉल रोखण्यासाठी सध्या तरी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही.
- फसवणुकीला कशा प्रकारे आळा बसू शकतो?
लॉटरी लागली, इ-मेल आले, बँक खाते नंबर मागितला, तर ग्राहकांनी तो कधीच द्यायला नको.
- अशा प्रकारच्या किती गुन्ह्यांचा आतापर्यंत शोध लागला आहे?
वर्षाला फसवणुकीचे सरासरी तीनशे गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यांचा शोध लागतो. मात्र, थोडा उशिराने लागतो. नागरिकांनी सतर्क झाल्यास हे प्रमाण कमी होईल.
बँक ग्राहकांनी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे...
लॉटरी लागली, बँकेतून कर्मचारी बोलतो, खाते क्रमांक आणि पासवर्ड द्या यांसारख्या फोन कॉल येण्याचे प्रमाण वाढले असून, यापूर्वीदेखील फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत, त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी पडता ग्राहकांनीच काळजी घेऊन जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, इंटरनेट अपडेशन कॉलद्वारे फसवणुकीचा नवीन प्रकार...तसेच, #९० किंवा #०९ क्रमांक दाबू नका...
बातम्या आणखी आहेत...