आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहवासाचे आमिष दाखवून बेरोजगारांची लूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसेंदिवस बेरोजगारांची फौज वाढत असताना दुसरीकडे नेमक्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन तरुणांना लुटण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. बेरोजगारांनाही झटपट कमाईचे आकर्षण असल्याची बाब हेरून त्यांना अलगद जाळ्यात पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून ‘घरबसल्या दहा हजार कमवा’, ‘प्रत्येक तासाला पैसे कमविण्याची संधी’, ‘पार्टटाइम काम-फुलटाइम पेमेंट’ अशा प्रकारच्या जाहिराती देऊन बेरोजगारांना आकर्षित केले जात आहे.
प्रत्यक्षात, अशा क्रमांकावर फाेन केल्यानंतर मात्र देहविक्रीसारखी कामे करावी लागतील असे सांगून नोंदणीसाठी चार हजार रुपये भरण्याची सक्ती केली जात आहे. प्रत्यक्षात असे पैसे भरून केवळ फसवणूकच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गोरखधंद्यावर ‘डी. बी. स्टार’चा प्रकाशझोत...
शहरात दिवसेंदिवस ऑनलाइन लुटीचे प्रकार वाढले असून, पोलिस प्रशासनाचे या ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे या धंद्यातील माफियांचे चांगलेच फावले आहे. पूर्वी धनदांडग्यांना फसवण्याचे प्रकार घडत होते. आता मात्र तरुण, बेरोजगारांच्या खिशाला हात घालण्याचे हे प्रकार सुरू झाले आहेत.
‘पार्टटाइम जॉब करून दिवसाला १५ हजार रुपये कमवा’, अशी एक जाहिरात करण्यात आली होती. या जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर ‘डी. बी. स्टार’च्या प्रतिनिधीने साधलेला हा संवाद असा...
- एक दिवसात हजारो कमवा, अशा प्रकारच्या फसव्या जाहिरातींवर बंधन घालता येणे शक्य आहे का?
अशाप्रकारच्या जाहिरातींवर बंधन घालणे शक्य नाही. मात्र, अशा जाहिरातींमुळे फसवणूक वा अन्य प्रकार झाल्यास त्याबाबत चौकशी केली जाते.
- हजारो रुपयांचे आमिष दाखवून छुप्या मार्गाने गैरप्रकार चालतात, त्याचे काय?
याबाबत कोणाची फसवणूक झाल्यास अथवा गैरप्रकार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.

- अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे का?
आतापर्यंतअशाप्रकारे फसवणूक वा गैरप्रकार झाल्या प्रकरणी गुन्हा नोंद झालेला नाही. मात्र, याबाबत जर कोणी फसविले गेल्याची तक्रार केल्यास त्याची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाईल.
‘तुम्ही कोणत्या भागात राहता, त्यानुसार ठरेल मीटिंग...’
जाहिरातीत देण्यात आलेल्या या क्रमांकावर संपर्क साधल्यास सुरुवातीला ‘तुम्ही कोणत्या भागात राहतात’, असा प्रश्न विचारण्यात येतो. ‘शहरात अशोक स्तंभ, रविवार कारंजा, उपनगर, नाशिकरोड, द्वारका, गंगापूररोड या भागांत आम्ही सर्व्हिस पुरवतो. तुम्ही ज्या भागात राहता, त्याच भागात तुम्हाला सर्व्हिस द्यावी लागेल. तुमची मीटिंग फिक्स झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणाहून पिकअप करण्यासाठी आमच्या कंपनीची गाडी येईल, त्यानंतर सहवासाचा माेबदला म्हणून तुम्हाला साधारणत: १५ हजार रुपये मिळतील. ते संपूर्ण पैसे तुमचेच असतील’, अशा प्रकारची माहिती संबंधित तरुणी देते.
पोलिसांची कसली भीती...
फोनवरील संबंधित व्यक्तीला पोलिसांबाबत विचारले असता, ‘तुम्ही या क्लबचे सदस्य होता आणि मग तुम्हाला क्लबच्या सदस्याबरोबरच मीटिंग करायची असते. या मीटिंगबाबतचे संपूर्ण संवाददेखील नेहमी फोनवरच होत असल्याने याबाबत पोलिसांना काही माहीत पडण्याचा प्रश्नच राहात नाही. त्यामुळे तुम्ही पूर्णत: निश्चिंत राहा. काळजी करू नका’, असे उत्तर देण्यात आले. यावरून अशा प्रकरणांत पोलिसांची कुठल्याही प्रकारची भीती बाळगली जात नसल्याचेही दिसून आले.
लाघवी बोलण्यातून धंद्याची समज
‘बेरोजगार तरुणांनो, नोकरीची गरज आहे का? तर मग लगेच आमच्याशी संवाद साधा, आंतरराष्ट्रीय रजिस्टर्ड कंपनीत काम करण्याची उत्तम संधी, पार्टटाइम काम करा आणि १५ ते २० हजार रुपये कमवा’, अशी जाहिरात देऊन संबंधित नोकरीसाठी विशिष्ट दूरध्वनी क्रमांक दिला जाताे. या क्रमांकावर दूरध्वनी केला तर महिला तुम्हाला तुमचे शिक्षण नाही तर चक्क तुम्ही कसे दिसता, कुठे राहता, तुम्हाला पैशांची अडचण आहे का, अशा प्रकारचे प्रश्न विचारत तुमच्याशी संवाद साधते अन् तुमच्याबद्दल पूर्ण माहिती विचारते. आपण त्यांना पूर्ण माहिती दिल्यानंतर ‘एक तासातच तुम्हाला हजारो रुपये कमवायचे असतील, तर तुम्हाला आमच्या क्लबचा सदस्य व्हावे लागेल’, असे आमिष दाखवत जाळ्यात अडकवले जाते.
असा झाला संवाद...
प्रतिनिधी : हॅलो, कोण बोलत आहे?
क्लब सदस्य : हॅलो, मै शिखा बोल रही हूं...
प्रतिनिधी: मुझे नोकरीकी जरूरत है, आपकी अॅड देखी। उसके बारे में जानकारी चाहिए थी।
क्लब सदस्य : हमारा क्लब है... जिसमे सारी उम्र के लडके और लडकियां है। हम क्लब सदस्योंको संतुष्ट करने का काम देते है।
प्रतिनिधी: तो हमें क्या करना होगा?
क्लब सदस्य : आप कहां रहेते है, आपको उस एरियामे ही क्लब सदस्य को आपकी सर्व्हिस देनी पडेगी. एक सर्व्हिस के लिए आपको १५ हजार रुपये मिलेंगे. लेकिन पहले आपको हमारे क्लब का सदस्य बनना पडेगा...
प्रतिनिधी: क्लब सदस्य कैसे बन सकते है?
क्लब सदस्य : आपको हमारे बँक अकाउंट में २०५० रुपये भरने पडेंगे। आप बँक में जाकर हमे फोन कीजिए, आपको हम हमारा बँक अकाउंट नंबर बताएंगे, उसमे पैसे भर दीजिए आपकी क्लब सदस्यता छह महिनों तक व्हॅलिड रहेगी।
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, छुप्या मार्गाने गैरप्रकार...
बातम्या आणखी आहेत...