आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या प्रांगणात मृतदेह, भयभीत झाले विद्यार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - गांधीनगरच्या जनता विद्यालयाच्या प्रांगणात ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. मंगळवारी (दि. १६) सकाळी शाळा उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला प्रांगणातील ध्वजारोहणाच्या पोलखाली हा मृतदेह दिसला.

ही घटना कळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. त्यात सकाळच्या सत्रातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची भर पडली. मृतदेह बघून विद्यार्थी भयभीत झाले. त्यामुळे प्रशासनाने शाळेचे वर्ग जवळच्या दुसऱ्या शाळेत भरविले. तरुणाचा खून करून रात्रीच्या अंधारात मृतदेह शाळेच्या प्रांगणात टाकण्यात आला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. विशाल लालाशेठ तांबोळी (३२, रा. स्टेट बँक काॅलनी, शिवाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर त्याचा मृतदेह शाळेच्या प्रांगणात टाकण्यात आला असावा. मैदानावर मृतदेह ओढत आणल्याच्या खुणा आहेत. मात्र, मारहाणीमुळे मृत्यू झाल्याच्या जखमा नसल्याने शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याने तूर्त पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली आहे.