आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारूने हरवलं होतं.. पण इच्छाशक्तीने जिंकलो!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सगळं काही सुरळीत सुरू असताना या सुखाला दारूची नजर लागली अन् काही काळातच होत्याचं नव्हतं झालं.. मित्रांनी वाळीत टाकलं.. कुटुंबीयांची बदनामी झाली, म्हणून तेही बोलेनासे झाले.. नोकरीवरून हात धुवावा लागला.. मनात एकच प्रश्न येत होता की, माझी इच्छा असूनही दारू मला का सोडत नाही.. नाशिकमधील काही तरुणांचे हे मनोगत. व्यसनमुक्तीसाठी शास्त्रीय उपाय केल्यामुळे त्यांची दारू पूर्णत: सुटलीय. या तरुणांना दारूने हरवले होते, पण इच्छाशक्तीने जिंकले. इतकेच नाही तर ते आज अन्य लोकांची दारू सोडविण्याचे चांगले काम करीत आहेत. अशाच दोघा तरुणांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील कहाण्या...
व्यसनमुक्तीने आयुष्य बदलले
मी एमबीए केलंय. माझ घराणं वाराणसीत प्रतिष्ठित म्हणून ओळखलं जातं. शिक्षणासाठी 2004 मध्ये दिल्लीत गेलो. श्रीमंत मित्र व मला घरून मिळणारा मुबलक पैसा यामुळे वाईट संगती लागल्या. दारूही पिऊ लागलो. एमबीए पूर्ण केल्यानंतर अनेक बॅँकांमध्ये काम केलं. पण, दारूनं पिच्छा सोडला नाही. त्यानंतर घरच्यांनी पुनर्वसन केंद्रात दाखल केलं. पण, काही काळात पुन्हा मी दारूच्या आहारी जायचो. असं काय आहे जे मला दारूकडे आकर्षित करतं, या प्रश्नांचं उत्तर मला सापडतच नव्हतं. नाशिकमधील लाईफ सेंटरने हे उत्तर दिलं आणि आज माझं आयुष्य बदलून गेलं आहे.
- वेदांत बागला, अधिकारी, रिअल इस्टेट कंपनी

दारूपासून पूर्णत: मुक्त झालो

कमी वेळात पैसा मिळण्याच्या नादात मी जुगार, क्रिकेटचे बेटिंग करू लागलो. पैसे जिंकलो तर आनंदात आणि हारलो तर दु:खात दारू पिऊ लागलो. बँकेत नोकरीला असल्यामुळे कर्ज काढायचो. दारूमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्याने कर्ज काढून दारू पिऊ लागलो. त्यानंतर घरच्यांनी माझी दारू सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आज मी दारूपासून पूर्णत: दूर गेलो आहे. व्यसनमुक्तीचे स्वतंत्र केंद्रही आता मी चालवतो.
जयंत निरंतर, समन्वयक, लाईफ रिहॅबिलिटेशन सेंटर
येत्या गुरुवारी कार्यक्रम
वाढती व्यसनाधीनता आणि व्यसनातून मुक्त होण्यासाठीच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ आणि लाईफ रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीने येत्या 26 जून रोजी सायंकाळी 5 वाजता कालिदास कलामंदिरात विनामूल्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 9767814725 किंवा 8378945676 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.