आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, दोघे गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव (जि. नाशिक) - नानावटी पेट्राेल पंपासमाेर मंगळवारी दुपारी बजरंग दलाचे कार्यकर्ते व गाेरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर एका टाेळक्याने प्राणघातक हल्ला केला. यात शिर्के गंभीर जखमी झाले  अाहेत. साेमवारी रात्री जनावरांची वाहतूक करणाऱ्या चालकास गाेरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली हाेती. या प्रकारातून शिर्के यांच्यावर हल्ला झाल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला अाहे. 

बजरंग दलाचे कार्यकर्ते व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रखंड मंत्री मच्छिंद्र शिर्के हे मंगळवारी दुपारी अापल्या सहकाऱ्यासह टाटा सुमाे वाहनातून नानावटी पंपावर अाले हाेते. गाडी उभी असताना दुचाकींवरून अालेल्या युवकांच्या टाेळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला, तसेच त्यांच्या गाडीच्या काचा फाेडून शिर्के यांना मारहाण केली. यात त्यांच्या डाेक्याला गंभीर मार लागला.  काही क्षणांतच हल्लेखाेरांनी पळ काढला. घटनेची माहिती कळताच संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पंपासमाेर रास्ता राेकाे करून हल्लेखाेरांच्या अटकेची मागणी केली.  दरम्यान, गाेरक्षा समितीचे सुभाष मालू, मच्छिंद्र शिर्के व अन्य तिघांनी साेमवारी रात्री जळगाव चाेंडीजवळ ११ जनावरांनी भरलेली गाडी पकडली हाेती. या वेळी मालू , शिर्के व अन्य तिघांनी वाहनचालक फारूक शकील शेख व फरीद कुरेशी यांना बेदम मारहाण केली तसेच चालक  फारूक यास पुलावरून फेकून दिले. यात फारूक गंभीर जखमी झाला अाहे. याप्रकरणी मालू व शिर्केविराेधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नाेंद अाहे.
बातम्या आणखी आहेत...