आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा सोशल मीडियाचा चमत्कार! अवघ्या तासाभरात सापडला हरवलेला मूकबधिर मुलगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूकबधिर कृषिकेश सोशल मीडियामुळे तासाभरातच सापडला. - Divya Marathi
मूकबधिर कृषिकेश सोशल मीडियामुळे तासाभरातच सापडला.
नाशिक/सटाणा - सोशल मीडिया व त्याचे व्यसन लागलेल्या तरुण पिढीबाबत फारसे चांगले बोलले जात नाही. सोशल मीडियाचा गैरवापरही केला जात असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. मात्र, याच सोशल मीडियामुळे एखादे अवघड व मोठे काम कसे सहज सोपे होऊन जाते, हे या उदाहरणावरून दिसून येते.  
 
असे आहे प्रकरण
सटाणा येथे आपल्या आईपासून दुरावलेला नऊ वर्षांचा मूकबधिर मुलगा अवघ्या एका तासात  सापडल्याचा चमत्कार केवळ सोशल मीडियामुळेच शक्य झाला आहे. तालुक्यातील निरपूर येथील जयश्री दौलत सूर्यवंशी या त्यांचा मुलगा कृषिकेश यास उपचारासाठी सटाणा येथे खासगी डॉक्टरांकडे घेऊन आल्या होत्या. नावनोंदणी करत असताना हा मुलगा नजर चुकवून अचानक बाहेर निघून गेला. ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला आसपास शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. 
 
मुलाची आई आली रडकुंडीला
रडकुंडीस आलेल्या आईची अगतिकता पाहून काही तरुणांनी या मुलाचा अपंगत्वाच्या ओळखपत्रावरील फोटो काढून ही ताबडतोब माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली अन् हरवलेला मुलगा सापडल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही केले. सामाजिक जाणिवेतून शेकडो नेटिझन्सनी लगोलग ही पोस्ट सर्वत्र व्हायरल केली.
 
असा लागला शोध
दरम्यान, दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील भाक्षी रोडच्या नववसाहतीतील भूषण सूर्यवंशी या तरुणाने व्हॉट्सअॅपवर ही पोस्ट पहिली आणि आपल्याकडे जेवण करित असलेल्या मुलाचा त्यांना ठावठिकाणा लागला. आधी या मुलाला बोलता येत नसल्याने अडचणी येत होत्या, मात्र सोशल मीडियावरील त्या पोस्टमुळे मार्ग मोकळा झाला.
बातम्या आणखी आहेत...