आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटख्याच्या पिचकारीने घेतला तरुणाचा जीव, विद्युत वाहिनीतून बसला शाॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - ताेंडातील गुटख्याची पिचकारी थेट उच्च विद्युत वाहिनीवर मारण्याची स्टाइल मालेगावातील एका तरुणाच्या जिवावर बेतली.

विजेच्या तीव्र धक्क्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. माेहंमद यासिन माेहंमद सलीम (२१) हा तरुण अब्दुल खालिक पार्क येथील हुरमतबी मशिदीशेजारी त्याचा भाऊ माेहंमद अमिन याला भेटायला गेला हाेता. माेहंमद अमिन हा गफर अब्दुल हनिफ हुसैन यांच्या कापड कारखान्यात कपड्यांवर रंगकाम करताे. दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर काम सुरू असताना माेहंमद यासिन याने ताेंडातील गुटख्याची पिचकारी बाहेर फेकली. या इमारतीच्या जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर पिचकारी पडल्याने यासिन विद्युत दाबाच्या िदशेने खेचला गेला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रमजानपुरा पाेलिस ठाण्यात अाकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...