आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात डेंग्यूसदृश अाजाराने एकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुन्यानाशिकमधील बागवानपुरा भागातील कासीम रउफ खान (१५) या मुलाचा डेंग्यूसदृश अाजाराने मृत्यू झाला. कासीम तीन दिवसांपासून आजारी होता. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू हाेते. अाजार अाणखी बळावल्याने साेमवारी (दि. ८) त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच शहरात डेेंग्यूसह साथीचे रोग बळावत असल्याचा अाराेप केला जात अाहे. शहरात धूर फवारणी नावालाच हाेत असल्याची नगरसेवकांची तक्रार बघता अाराेग्य विभागाला बेजबाबदारपणाचा संसर्ग जडल्याचे दिसतेे. जुन्या नाशकात आणखी ३५ डेंग्यूचे संशयित रुग्ण डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात थडा, नानावली, काझीपुरा, वडा‌ळागाव द्वारका परिसरातील रुग्णाची संख्या जास्त आहे.
प्लेटलेट‌्स कमी हाेत्या
-दाेनदिवसांपासून कासीमवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातच उपचार सुरू हाेते. या मुलांच्या रक्त तपासणीत प्लेटलेट‌्स खूपच कमी झाल्याचे अाढळले हाेते. त्यास डेंग्यू असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. डॉ.राजेंद्र भंडारी, मुख्यवैद्यकीय अधिकारी, महापालिका