आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधील 92 वर्षीय आजीचे मृत्यूपश्चात त्वचादान; जळीत रुग्णांना फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मृत्यूपश्चात नाशिकमधील एका ९२ वर्षीय महिलेची त्वचा दान करण्यात अाली. या बँकेतून दुसऱ्यांदा त्वचादान यशस्वीपणे पार पडले अाहे. राेटरी क्लब अाॅफ नाशिकच्या जनजागृतीमुळे हे त्वचादान करून घेण्यात यश अाले अाहे.

अाजी उषा भारदे (९२) यांचे अल्पशा अाजाराने दाेन दिवसांपूर्वी निधन झाले हाेते. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. मृत्यूनंतर अापण समाजाच्या उपयाेगी पडावे अशी या अाजींची इच्छा हाेती. त्यानुसार त्यांचा नातू मंदार भारदे यांनी अाजीची त्वचा दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डाॅक्टरांनी त्वरित राेेटरी- वेदांत हाॅस्पिटल स्किन बँक येथे फाेन करून माहिती दिली. त्यानंतर लगेचच ‘त्वचादान’ पथकातील डाॅ. राजेंद्र नेहेते, डाॅ. अनिता नेहेते, डाॅ. अमाेल घालमे, नीलेश कुरणेकर, सारिका तायडे, सुवर्णा पाटील यांनी सकाळी ९.३० वाजता हाॅस्पिटलमध्ये जाऊन यशस्वीपणे त्वचादान करवून घेतले. जळीत रुग्णांना माेठ्या प्रमाणात त्वचेची गरज भासते. यासाठी त्वचादानाचे प्रमाण वाढणे गरजेचे अाहे, असे अावाहन राेटरीच्या पदाधिकाऱ्यांनी केले अाहे.

२७ जूनला झाले पहिले त्वचादान
नाशिकमध्येमे राेजी त्वचा बँक सुरू करण्यात अाली. त्यानंतर २७ जून राेजी सुभाष भानुशाली या ६९ वर्षीय व्यक्तीच्या माध्यमातून या बँकेत पहिल्यांदा त्वचादान झाले. नाशिकमधील त्वचा बँक देशातील वी राज्यातील तिसरी बँक असल्याची माहिती राेटरीचे अध्यक्ष विवेक जायखेडकर यांनी दिली. यापूर्वी राज्यात नागपूर एेराेली येथे त्वचा बँक अाहे.

मृत्यूनंतर सहा तासांत करता येते दान
मृत्यूनंतर मानवी शरीरातील फक्त डाेळे त्वचा अशा दाेनच भागांचे दान करता येऊ शकते. त्यातही त्वचेचा अाजार असलेल्या कॅन्सर असलेल्या रुग्णाला त्वचा दान करता येत नाही. मात्र ज्या व्यक्ती त्वचा दान करू शकतात त्यांचा जळीत रुग्णाला फायदा हाेताे. जळीत व्यक्तीला त्वचा नसल्याने त्याला जंतुसंसर्ग तातडीने हाेताे. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. मात्र ही त्वचा जळीत रुग्णास दिल्यास त्यांची वाचण्याची शक्यता वाढते.
बातम्या आणखी आहेत...