आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक : उद्याेजकाचे डेबिट कार्ड हॅक, 72 हजार रुपये काढले परस्पर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बँकेचे डेबिट कार्ड हॅक करून नाशिकच्या ग्राहकाच्या खात्यातील सुमारे ७५ हजाराची रक्कम परस्पर जर्मनीतील असलेल्या भामट्याने अाॅनलाइन व्यवहाराद्वारे काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. या प्रकरणी मंुबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात नाशिकराेड भागातील निवृत्त बंॅक व्यस्थापकाला २१ लाखांना गंडा घातल्याच्या प्रकारापाठाेपाठ उद्याेजकाचे डेबिट कार्ड हॅक करून पैसे काढून घेतल्याच्या या प्रकाराने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अाहे. 

मुंबईनाका पाेलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, हिरालाल रामदास जाधव (रा. अशोका मार्ग) यांची सोलर पॉवर प्रॉडक्टची कंपनी आहे. या उत्पादनासाठी महत्त्वाचे सुटे भाग विदेशातून मागवावे लागतात. या सुटे भागाच्या व्यवहाराची रक्कम अाॅनलाइन व्यवहाराद्वारे पाठवली जाते. जाधव यांनी दाेनच दिवसांपूर्वी अॅक्सिस बंॅकेत अापल्या खात्यावर झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. त्यासाठी छापील रेकाॅर्ड मिळाले असता त्यांच्या खात्यातून परस्पर काेणीतरी ७५ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याचे उघडकीस अाले. ही रक्कम काढल्यानंतर माेबाइलवर बंॅकेकडून मेसेजही अाला नसल्याने त्यांनी बंॅकेत धाव घेत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तपासणीनंतर जाधव यांचे डेबिट कार्ड हॅक करून जर्मनीत पैसे ट्रान्सफर झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत बंॅकेकडून याेग्य ती माहिती जाधव यांना देण्यात अाली असून ही रक्कम परत मिळण्यासाठी रिझर्व बंॅकेच्या नवीन नियमानुसार पुढील पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात अाले. दरम्यान, जाधव यांच्याबाबत घडलेल्या या प्रकाराने बंॅक अधिकारीही गाेंधळात सापडले असून नाशकातीलाग्राहकाने कुठल्याही डेबिट कार्डवर व्यवहार केला नसताना जर्मनीत ते कार्ड स्वॅप हाेऊन बंॅक खात्यातून रक्कम काढली गेल्याने ते अाश्चर्यचकीत झाले अाहेत. गेल्याच महिन्या नाशिकराेडच्या निवृत्त बंॅक व्यवस्थापकाला अाॅनलाइन खरेदी-विक्रीचे अामीष दाखवून २१ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार देखील सायबर पाेलिसांनी उघडकीस अाणला अाहे. त्या पाठाेपाठ या घटना वाढत असल्याने पाेलिस अाणि बॅंकेकडून ग्राहकांना जागरूक केले जात अाहे. काेणत्याही अज्ञात व्यक्तीला अथवा माेबाइलवर एटीएम कार्ड असाे की डेबिट कार्डचा पासवर्ड, त्यावरील अकरा अाकडी क्रमांक देऊ नये, घरातही काेणाला सांगू नये, अशा सूचना देण्यात अाल्या अाहेत. 

बँकेत नोकरीचे अामिष दाखवत ३० हजारांना गंडा 
बँकेतनोकरी लावून देण्याचे अामिष दाखवून नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे आणि साहित्य शुल्कासाठी ३० हजारांची रक्कम बँकेत भरण्यास सांगत एका तक्रारदाराची फसवणूक करण्याचा प्रकार रविवारी (दि. १७) देवळाली कॅम्प येथे उघडकीस आला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संजीव वर्मा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मोबाईलवर विशाखा नावाच्या महिलेचा फोन आला. एचडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे सांगत ‘बँकेत भरपूर जागा रिक्त आहेत, नोकरी लावून देऊ,’असे सांगितले. दोन फोन आल्यानंतर वर्मा यांचा विश्वास बसला. संबंधित महिलेने नोकरीसाठी लागणारे प्रशिक्षण साहित्य, लॅपटॉप, मोबाईल आणि कुरिअर खर्चाचे ३० हजार रुपये स्टेट बँकेच्या खात्यात भरण्यास सांगितले. महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवत वर्मा यांनी दिलेल्या खात्यात पैसे भरले. दोन दिवसांनतर फोन केलेला प्रयत्न विफल झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शर्मा यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. 
बातम्या आणखी आहेत...