आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर वसुलीसाठी पालिकेचे डेबिट कार्ड, १८ कर संकलन केंद्रांत ठेवणार यंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अार्थिक खडखडाटाचा सामना करणाऱ्या महापालिकेला अपुरे मनुष्यबळ अन्य कारणामुळे घरपट्टी पाणीपट्टी वसुलीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेत अाता प्रशासनाने अठरा कर संकलन केंद्रांत डेबिट कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. याबराेबरच भविष्यात कर भरण्यापासून तर काेठेही खरेदीसाठी उपयुक्त ठरेल असे स्वत:चे कार्डही महापालिका विकसित करणार अाहे.

पालिकेची अार्थिक स्थिती खालावत असून, ५० काेटींपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून मुक्त केल्यानंतर अार्थिक काेंडीच झाली हाेती. शासनाने एलबीटी भरपाईबाबत दिलेल्या अनुदानाबाबत अनियमिततेमुळे अाेढाताण हाेत हाेती. दुसरीकडे, घरपट्टी, पाणीपट्टी कराची वसुली पूर्ण क्षमतेने हाेत नव्हती. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत त्यावर पांघरूण टाकले जात हाेते. मात्र, उत्पन्न वसुलीतील अकार्यक्षमतेमुळे केवळ विकासकामेच नव्हे, तर पालिकेत काम करण्यासाठी मनुष्यबळाची उभारणीही अशक्य हाेणार अाहे. या पार्श्वभूमीवर सहज साेप्या पद्धतीने कर वसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले अाहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेची सहाही विभागीय कार्यालये १२ कर संकलन केंद्रांत डेबिट कार्डची यंत्रणा बसवली जाणार अाहे. त्यासाठी एका खासगी बँकेकडून यंत्रणा उभारणीबाबत चाचपणी केली जात अाहे.

पुढील तीन महिने कसाेटी
हजारपाचशे रुपयांच्या नाेटा कर वसुलीसाठी ग्राह्य धरल्याने पालिकेची नाेव्हेंबरअखेरीस ११५ काेटींपैकी ६२ काेटी १३ लाखांची घरपट्टी वसूल झाली तर, पाणीपट्टीचे ४१ काेटी उद्दिष्ट असताना १४ काेटींची वसुली झाली. ३० काेटींपेक्षा अधिक वसुली ही पंधरा दिवसांत लाेकांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या भरण्यामुळे अाहे. मात्र, यापुढील तीन महिन्यांत अशी परिस्थिती राहण्याची शक्यता कमी अाहे. त्यात महापालिकेची निवडणूक असल्यामुळे डिसेंबर, जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कर वसुली कितपत हाेईल, असाही प्रश्न अाहे. त्यामुळे मार्च महिन्यात पुन्हा उर्वरित कर वसुलीसाठी पालिकेची दमछाक हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...