आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्रामच्या स्वच्छतेबाबतच्या वादग्रस्त ठेक्याचा आज होणार फैसला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्रामस्वच्छतेचा ठेका वॉटरग्रेस प्रोडक्ट‌्सला नाकारणाऱ्या स्थायी समितीस आयुक्तांच्या पत्रामुळे बळ मिळाले असून, आता कायदेशीर अडचण टळण्यासाठी वकिलांचे मत घेऊन उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही स्थायीवर नामुष्की येणार नाही, हे तपासून काम देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी एका स्थायी सदस्याने मुंबईला धाव घेतली असून, गुरुवारी (दि. ६) या ठेक्याबाबत सोक्षमोक्ष होणार आहे.

आयुक्तांनी जवळपास एक कोटी आठ लाखांची थकबाकी असल्याचा लेखापरीक्षकांचा अहवाल जोडल्यामुळे स्थायीने संबंधितांना काम देण्यास नकार देत दुसऱ्या क्रमांकावरील ठेकेदाराला कामाचे आदेश दिले. त्याविरोधात वॉटरग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने निर्णय स्थायीकडे सोपवल्याची माहिती महापालिकेचे वकील जे. शेखर अॅण्ड कंपनीने दिली. निकालपत्राअभावी ठेक्याचे घोंगडे भिजत पडले. दरम्यान, आयुक्तांकडून सभापती शिवाजी चुंभळे यांनी पत्राद्वारे ठेकेदाराविषयी माहिती घेतली. त्यात ठेकेदार काळ्या यादीत असल्याचे त्याच्याकडे थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी स्थायी उच्च न्यायालयाच्या कायदेशीर सल्ला घेणार आहे. त्यासाठी मनसे नगरसेवक यशवंत निकुळे मुंबईला गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील क्रिस्टल कंपनी राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित असल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला होता. सभापतिपद राष्ट्रवादीकडे असल्यामुळे उगाच आरोप नको म्हणून कमी कालावधीत नवीन निविदा काढणे वा मानधनावर वाल्मीकी, मेहतर, मेघवाळ समाजासह अन्य स्थानिक भूमिपुत्रांना सफाईचे काम देता येईल का, याबाबत चाचपणी केली जात असल्याचे समजते.

महापालिकेला वकिलांची नोटीस
वादग्रस्तठेक्यात महापालिकेची बाजू सक्षमपणे मांडली गेल्याने सदस्यांनी वकिलांबाबत संशय व्यक्त केल्याच्या बातम्यांमुळे जे. शेखर अॅण्ड कंपनी या महापालिकेच्या पॅनलवरील वकिलांनी विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांना नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या प्रत्येक खटल्यात तत्त्व, निष्ठा प्रामाणिकपणे बाजू मांडल्याचा दावाही केला आहे.
बातम्या आणखी आहेत...