आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deem And Dump Student Enjoy Water Park At Nashik

मूकबधिर विद्यार्थ्यांनी लुटला विविध राइड्सचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जागतिक अपंग दिन सप्ताहानिमित्त नाशिकरोड येथील विकास मंदिरातील विशेष व मूकबधिर विद्यार्थ्यांना महापालिका सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी त्र्यंबकेश्वर येथील शुभम वॉटरपार्कची मोफत सफर घडवून आणली. या सफरीत मतिमंद शाळेच्या तीनही विभागांतील 120 विद्यार्थ्यांनी सकाळपासून पार्कमधील वेगवेगळ्या ड्राइव्हचा मनमुराद आनंद लुटला. दरम्यान, या उपक्रमामुळे मुलांच्या मनातील पाण्याची भीती दूर झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त दिली.
त्र्यंबकेश्वर रोडवरील अंजनेरी येथील शुभम वॉटरपार्कमधील वेगवेगळ्या राइड्सचा आनंद लुटण्यासाठी शाळांना पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतांश शाळांतील विद्यार्थ्यांनी वॉटरपार्कमधील वेगवेगळ्या राइड्सचा आनंद लुटला आहे. हा आनंद मतिमंद व कर्णबधिर मुलांनाही मिळावा, यासाठी ‘होसला’ या एनजीओचे पदाधिकारी जगबीर सिंग यांनी प्रयत्न केले.
पोलिस अकॅडमीचे उपसंचालक हरीश बैजल, त्र्यंबकेश्वरचे पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांनीही त्यासाठी मदत केली. वॉटरपार्कचे संचालक शशिकांत जाधव यांनीही त्वरित होकार देत या मुलांना वॉटरपार्कमधील सर्व राइड्स विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. मुख्याध्यापिका सुहासिनी घोडके, रिटा चक्रनारायण, अनिता कापसे, संगीता जाधव, कमल उबाळे, सुनंदा बारसे, धर्मा सोनवणे, बाळासाहेब भुजबळ, संतोष वाघ आदींनी या उपक्रमादरम्यान मुलांची काळजी घेतली.