आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्युलेक्स डासापासून करा बचाव...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डासांची संख्या वाढली असतानाच क्युलेक्स या डासाचे आगमन झाल्यामुळे नाशिककरांना बचावासाठी आराेग्याची आणखी काळजी घ्यावी लागणार आहे. या डासाने डंख मारल्यानंतर हातापायावर पुरळ येणे चुरचरणे असे प्रकार हाेत असून, डासांची उत्पत्तीच हाेणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.

पालिकेने डासांची घनता माेजली असून, अनेक ठिकाणी डासांवर नियंत्रण आले आहे. मात्र, या सर्वात क्युलेक्स या जातीच्या डासाची संख्या वाढली आहे. वास्तवात, क्युलेक्स या जातीचा डास चावल्यानंतर हत्तीपाय हा आजार हाेताे. मात्र, नाशिकमधील या डासामध्ये तितक्या गांभीर्याचा आजार हाेण्याइतपत क्षमता नसल्याचा निर्वाळा आराेग्याधिकारी डाॅ. सुनील बुकाने यांनी दिला.
डासमाेजणीसाठी दाेन कर्मचारी : १५लाख लाेकसंख्येच्या शहरातील डासांची घनता माेजण्यासाठी अवघे दाेनच कर्मचारी महापालिकेने नेमल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे. दरमहा प्रत्येक विभागात हे कर्मचारी जाऊन एका ट्यूबमध्ये विशिष्ट कालावधीत किती डास अडकतात यावरून घनता निश्चित करतात, असेही आराेग्याधिका-यांनी सांगितले.