आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्रामचे जागावाटप लांबणीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यासाठी पाेलिस अाणि प्रशासनाच्या तयारीचे ‘पाॅवर पाॅइंट प्रेझेंटेशन’ द्वारे सादरीकरण नाशिकमधील तिन्ही अाखाड्यांच्या प्रमुख साधू-महंतांपुढे साेमवारी दुपारी नियाेजन भवनात करण्यात अाले. तिन्ही अाखाड्यांमध्ये अजून जागानिश्चितीबाबत चर्चा झाली नसल्याने हा निर्णय दाेन - तीन दिवसांत अापापसात विचारविनिमय करून साेडविण्यात येईल, असे नाशिकमधील अाखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी या बैठकीत सांगितले.
येथील नियाेजन भवनात झालेली जागावाटपाची बैठक केवळ कुंभ तयारीच्या माहितीबाबत देवाणघेवाण करूनच संपुष्टात अाली. यावेळी महंत ग्यानदास महाराज यांनी रामकुंडातील काँक्रिटीकरण काढून टाकून तेथील मूळ स्राेत जिवंत करावेत, असे प्रशासनाला सांगितले. साधुग्राममध्ये काही अपेक्षित बदलास प्रशासनाने तत्परता दाखवल्याबद्दल त्यांचे अाभार मानले. तसेच, प्रशासनाच्या अन्य तयारीबाबत समाधान व्यक्त करीत काही अपेक्षा व्यक्त केल्या. प्रशासनाकडून गहू मिळणार असल्यास ताे दळून मिळण्याची व्यवस्था करावी, अन्यथा गव्हाचा अाटाच मिळावा, असेही सांगितले. हरिद्वारलादेखील मुख्य कुंडात काँक्रिटीकरण करण्यात अाले हाेते, मात्र साधू-महंतांनी सांगितल्यावर ते काढून टाकले. त्यानुसार, या कुंडातील काँक्रिटीकरणही काढून टाकावे, असेही ग्यानदास यांनी नमूद केले. त्याअाधी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका अायुक्त प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात अालेल्या तयारीबाबतचे सादरीकरण केले. तर, पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी लाखाे भाविकांच्या उपस्थितीतही कायदा -सुव्यवस्था कशी राखली जाईल, त्याबाबतच्या तयारीचे सादरीकरण केले.

अाखाडा परिषदेच्या वतीने या मागण्या
अाखाडापरिषदेच्या वतीने बाेलताना महंत ग्यानदास यांनी बडा लक्ष्मीनारायण मंदिर चाैकाला जगद‌्गुरू रामानंदाचार्य चाैक, लक्ष्मीनारायण मंदिर ते अाैरंगाबादराेडला ‘अाखाडा मार्ग’, अाैरंगाबादराेड ते तपाेवनराेड चाैकाला ‘बालानंदाचार्य चाैक’ असे नाव देण्याची मागणी केली. तसेच, तपाेवनराेडवरील प्रवेशद्वाराला ‘अाद्य जगद््गुरू रामानंदाचार्य’ असे नाव देण्याची मागणी केली. साधुग्रामच्या जमिनीचे अारक्षण घाेषित करणे, संबंधितांना त्याची किंमत देणे, कुंभासाठी अधिग्रहित ३३५ एकर जागेला कायमस्वरूपी अधिग्रहित करून ितथे कुंभ प्राधिकरण स्थापणे, तीन अनी अाणि सर्व अाखाड्यांना जमीन लेखी स्वरूपात देणे अाणि शाहीमार्ग परिवर्तन कायम करण्याची मागणी केली.