आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील विजयाने ‘अाम अादमी’चा नाशकात जल्लाेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पाचसाल केजरीवाल, अाम अादमी जिंदाबाद... अशा घाेषणा देत अाम अादमीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शहरातील प्रमुख भागात दिल्लीतील एकतर्फी विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. पक्षचिन्ह असलेला झाडू फिरवत, त्याचप्रमाणे ‘भारतमाता की जय’च्या घोषात तिरंगी फडकावत कार्यकर्त्यांनी काेठे पेढे, काेठे खडीसाखर, तर कोठे आइस्क्रिम वाटून विजयाेत्सव साजरा केला.
दिल्लीतील प्रचारासाठीही नाशकातून पक्षाचे कार्यकर्ते गेले हाेते. अपेक्षेप्रमाणे सकाळपासूनच ‘अाप’च्या जागांचा अाकडा वाढू लागल्यावर कार्यकर्त्यांच्या अानंदला उधाण अाले हाेते. ‘अाप’चे शहर समन्वयक जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारक, मेहेर सिग्नल, काॅलेजराेड, नाशिकराेड येथे ‘अाप’च्या कार्यकर्त्यांचा अानंदाेत्सव सुरू हाेता. खडीसाखर, पेढे अाइस्क्रिमचे वाटप झाले.

शपथविधीसाठीजाणार दिल्लीत : विजयीजल्लाेषानंतर भावे यांनी दिल्ली येथील शपथविधीसाठी नाशकातून ‘अाप’चे कार्यकर्ते जातील, असेही स्पष्ट केले.

नाशिकमध्ये मिळणार ‘अाप’ला संजीवनी : वर्षभरापूर्वीदेशात अाम अादमी पक्षाची लाट असताना नाशिकमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हाेता. शहरात ‘अाप’साठी पाेषक वातावरण असताना अचानक िदल्लीतील राजकीय पेचप्रसंगात ‘अाप’चे पानिपत झाले. त्यानंतर माेदी लाटेत पक्ष लुप्तच झाल्याचे चित्र हाेते. पक्षाकडे विजय पांढरे यांच्यासारखे वजनदार नेते असताना अार्थिक परिस्थिती अन्य कारणांमुळे पक्षाची वाताहत झाली. दिल्लीत ‘अाप’ला स्पष्ट बहुमत िमळाल्यानंतर अाता हुरूप वाढलेल्या कार्यकर्त्यांनी ‘लक्ष्य महापालिका’ असा नारा िदला अाहे. दाेन वर्षांनी महापालिकेच्या िनवडणुका होणार असून, अाता ‘अाप’चे कार्यकर्ते कशी वातावरणनिर्मिती करतात, यावर भवितव्य अवलंबून राहणार अाहे.

फसवणूक कारणीभूत
भाजपस्वप्नपूर्ती करू शकल्याने नागरिकांनी ‘आप’ला पसंती दिली आहे. अॅड.राहुल ढिकले, महानगरप्रमुख, मनसे

सर्वसामान्यांकडून धडा
लोकशाहीमध्येसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानूनही त्याला राजकीय नेत्यांनीच नाकारल्याने मतदारांनी भाजपला शिक्षा दिली. -जितेंद्रभावे, महानगरसमन्वयक

चढ-उतार येतातच
राजकीयप्रवासात चढ-उतार येतातच. भाजपचे सरकार केंद्रात अाणि राज्यात उत्तमरीत्या काम करत अाहे. लक्ष्मणसावजी, शहराध्यक्ष, भाजप

‘अाप’चेही भविष्य खराबच
भाजपलाखाेटे बाेलणे भाेवले. तसेच, ‘आप’ने ही खोटे बोलून सत्ता मिळविली आहे. भविष्यात त्यांचीही भाजपप्रमाणेच स्थिती होणार आहे. -शरद आहेर, शहराध्यक्ष,काँग्रेस

विश्वास सार्थ ठरवावा
केजरीवालांनीजनतेला दिलेल्या अाश्वासनांची पूर्तता करावी. अण्णा हजारे यांच्या मागण्यांची केंद्र सरकारकडून पूर्तता करून घेत दिल्लीकरांंचा विश्वास सार्थ ठरवावा. हेमंत जगताप,
भ्रष्टचारिवराेधी जनअांदाेलन
हुकुमशाहीला चपराक
हुकुमशाहीलासर्वसामान्य नागरिकांनी दिलेली ही चपराक अाहे. गाेरगरिबांचे सरकार नसल्याने त्यांनी दिल्लीत बदल घडवून अाणला अाहे.- अर्जुनिटळे, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी

भविष्यातील चित्र वेगळे
मनसे,भाजपाप्रमाणेच दिल्लीतही ‘आप’ची लाट होती. त्यामुळे विजय झाला. लाट ही ओसरत असते. भविष्यात सेनेचीही लाट येईल. अजयबोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना

अानंदाेत्सव धनशक्तीचा पराभव
प्रस्थापितपक्षांना मोठा धडा मिळाला असून, चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. सत्ता आणि धनशक्तीचा पराभव झाला आहे. -पां. भा. करंजकर, ज्येष्ठपत्रकार