आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल मनःशांतीसाठी इगतपुरीत; 40 वर्षे कफचा त्रास सहन केल्यानंतर जिभेवर शस्त्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी- शहरातील विपश्यना विश्व विद्यापीठ (धम्मगिरी) येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनःशांतीसाठी आले आहेत. निसर्गरम्य परिसरात 10  दिवसीय शिबिरात साधना करणार आहेत. केजरीवाल यांनी याआधी देखील विविध ठिकाणी विपश्यना केली होती.

अरविंद केजरीवाल इगतपुरी येथे प्रथमच आले आहे. मुंबई विमानतळावर आल्यानंतर ते मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत इगतपुरीला पोहोचले. धम्मगिरीच्या वतीने व्यवस्थापक सावलाजी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, सुनील रोकडे उपस्थित होते.

खोली क्र. 3 मध्ये निवास
धम्मगिरीत प्रवेश केल्यानंतर केजरीवाल यांनी व्यवस्थापकांसह चहा घेत 20 मिनिटे संवाद साधला. त्यानंतर स्वतः वाहनाकडे जाऊन कपड्यांची बॅग हातात घेत सुरक्षारक्षकांसह धम्मगिरीतील क्र. 3 च्या खोलीत रवाना झाले. या सर्व दौऱ्यात त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 20 सप्टेंबरपर्यंत ते येथे साधना करणार आहेत.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...केजरीवालांच्‍या जिभेवर झाली होती शस्त्रक्रिया...
बातम्या आणखी आहेत...