आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाेरमधून नाशिकला ‘टप्पा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-पुणे-अाैरंगाबाद असा नवीन काेन तयार झाल्याची चर्चा - Divya Marathi
मुंबई-पुणे-अाैरंगाबाद असा नवीन काेन तयार झाल्याची चर्चा
नाशिक - मुंबई तसेच मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नाशिकमध्ये २३.१७ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध नसल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने दिल्यानेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाेर (डीएमअायसी)च्या पहिल्या टप्प्यात नाशिक वगळले गेले. विशेष बाब म्हणजे, नाशिकहून प्रसंगी पाणीपुरवठा केला जाताे, त्या अाैरंगाबादचा या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समावेश झाला. २०१० साली तत्कालीन सरकारमधील काहींनी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळेच नाशिकची पिछेहाट झाली अाहे. शेंद्रा-बिडकीन परिसरात अाज जवळपास साडेसात हजार हेक्टर जमीन संपादित केली जात असून, हजाराे काेटींची गुंतवणूक देशी-विदेशी उद्याेग तेथे करीत अाहेत अाणि तेथील विकास झपाट्याने हाेऊ लागला अाहे. इकडे नाशिकमध्ये गेल्या १६ वर्षांत एकाही माेठ्या उद्याेगाने गुंतवणूक केलेली नाही हे वास्तव अाहे. मुंबई-पुणे-नाशिक विकासाचा सुवर्णत्रिकाेण मानला जात हाेता, मात्र या त्रिकाेणात नाशिकची जागा अाैरंगाबादने घेतली असून नवा काेन तयार झाल्याचे बाेलले जातेय.

या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाेरमध्ये सिन्नर तालुक्यातील सुमारे ३२३० हेक्टर जमिनीचा समावेश असून, दुसऱ्या टप्प्यात ताे विकसित हाेण्याचे प्रस्तावित अाहे. तत्कालीन सहमुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई यांनी सुचविल्यानुसार सिन्नर तालुक्यातील टप्पा क्रमांक २, ३, ४, ६ व ७ या क्षेत्राचा समावेश डीएमअायसीसाठी करण्याचे प्रस्तावित हाेते. टप्पा क्रमांक ३, ४ व ६ या अाैद्याेगिक क्षेत्राच्या संयुक्त माेजणीला स्थानिकांचा विराेध हाेता, त्यामुळे संयुक्त माेजणी झाली नाही. लाेकप्रतिनिधींनी सुचविल्यानुसार काही ठिकाणची जमीन वगळावी याकरीता मंजुरीही मिळाली असून वगळलेल्या क्षेत्राची अधिसूचनादेखील काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे  सूत्रांनी सांगितले.
 
दृष्टिक्षेपात
- नाशिकमध्ये २३ लहान-माेठी धरणं
- मुंबई अाणि नगर जिल्ह्याकरिताही नाशिकमधील प्रकल्पांतून पाणी पुरविले जाते.
- दारणा अाणि गंगापूर धरणातून जाते मराठवाड्याला पाणी
- यातही गंगापूर धरणातून नाशिक महापालिका, एमअायडीसी, नाशिक व निफाड तालुक्यातील
काही गावांचे पिण्याच्या पाण्यासाठी अारक्षण अाहे. असे असतानाही पिण्याच्या पाण्याच्या कारणासाठी गतवर्षी मराठवाड्याला
येथून पाणी साेडले गेले हाेते.
 
पाणी उपलब्ध हाेऊ शकत नसल्याचा अहवाल 
सिन्नर येथील माैजे बारागाव पिंप्री, पाटपिंपरी, देशवंडी, साेनांबे-काेनांबे, हरसुळे, पास्ते व खपराळे गावच्या हद्दीतील ५ हजार हेक्टर एवढे क्षेत्र अंतिमरित्या डीएमअायसीकरिता प्रास्तावित हाेते. या क्षेत्राकरिता अावश्यक असलेले २३.१७ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या अंतिम मागणीसाठी पाटबंधारे विभागाकडे गाेदावरी व दारणा समूहातून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी एमअायडीसीने केली हाेती. मात्र, या समूहातून ९५ टक्के विश्वासार्ह पाणी उपलब्ध हाेऊ शकत नाही असे पत्र २७ अाॅक्टाेबर २०१० राेजी पाटबंधारे विभागाने (पत्र जा. क्र. ७९३१) एमअायडीसीला कळविले. ही बाब एमअायडीसीने शासनाच्या जलसंपदा विभागाचे अवर सचिव यांच्याकडील दिनांक ४ जुलै २०११ च्या पत्राद्वारे खातरजमा केली.
 
मेक इन नाशिकच्या पार्श्वभूमीवर अहवाल कळीचा
सध्या मुंबईत हाेणार असलेल्या ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाची तयारी जाेरात सुरू अाहे. पालकमंत्री स्वत: जातीने यात लक्ष देऊन अाहेत, त्यामुळे या नकारात्मक अहवालाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे अाहे. पालकमंत्र्यांकडेच असलेल्या जलसंपदा विभागाने दिलेल्या या नकारात्मक अहवालामुळे उद्याेगांच्या संभाव्य गुंतवणूकीला अडसर ठरणारा अाहे. त्यामुळे तत्काळ हा अहवाल बदलणे गरजेचे अाहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, 
- पाणी नसल्याचा बाऊ करणे धाेकादायक
- पालकमंत्र्यांनी अहवाल बदलासाठी अाग्रही व्हाव
- .. तर सहज पाणी देता येऊ शकत हाेते 
-  नदीजाेड प्रकल्पाकडे बाेट
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...