आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deliver Yours Development Works To Citizens Raj Thackeray

‘बाेलते व्हा’ची राजाज्ञा, विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पाेहचवण्याचे राज ठाकरेंचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठीच्या दाै-यात गुरुवारी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. राज यांच्या या महत्त्वपूर्ण दाै-याकडे पक्षाच्या नाखूश निम्म्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने तर राज यांनी डाेक्याला हात लावला नसावा ना.
नाशिक - मनसेची सत्ता आल्यानंतर शहरात काेट्यवधींची कामे झाली. रस्त्यांचा चेहरामाेहरा बदलला. मात्र, त्याचे श्रेय पक्षाला मिळत नसल्याचे बघून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना ‘बाेलते’ हाेण्याचे आदेश दिले. दाेन वर्षांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी माेर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र असून, १६ एप्रिलनंतर पुन्हा ते चार दिवस शहरात तळ ठाेकणार आहेत.
प्रत्येक आठवड्यात शहरातील चांगल्या कामांची स्थिती आढावा प्रसार माध्यमांसमाेर ठेवून लाेकांपर्यंत पाेहचवण्याच्या सूचनाही पदाधिका-यांना त्यांनी केल्याचे समजते. दाेनदिवसीय दाै-यात राज यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तूर्तास मी पूर्णपणे चांगली कामे हाेण्यासाठी लक्ष केंद्रित केल्याचेही त्यांनी सांगितले. चांगल्या कामांचे श्रेय मनसेला मिळत नसल्याचे लक्षात आल्याने महापाैर, महानगरप्रमुख अन्य पदाधिका-यांना लाेकापर्यंत विकासकामांची माहिती पाेहाेचवण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य रस्त्यांवर आकर्षक शिल्पे येणार
राजयांनी गाेेदापार्क प्रमुख रिंगराेडची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी शहरातील काही वास्तुविशारदांशी चर्चा केली. या वेळी महापाैर अशाेक मुर्तडक, महानगरप्रमुख राहुल ढिकले, आयुक्त गेडाम आदी उपस्थित हाेते. शहरातील रस्त्यांवर प्रवेश केल्यानंतर लक्ष वेधून घेणारी आकर्षक शिल्पे वा वाहतूक बेटे विकसित करण्याच्या सूचना राज यांनी केल्या.

पुन्हा तीन दिवसांचा दाैरा
१६ एप्रिल राेजी नाशिक दाै-यावर येणार असून, तीन दिवस येथेच थांबणार असल्याचे राज यांनी सांगितले. तत्पूर्वी संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर शहर जिल्हा कार्यकारिणी विस्तारासाठी मुलाखती घेतील. यानंतर पुनर्रचना जाहीर हाेईल.

१६ नगरसेवकांची दाै-याकडे पाठ
राजयांच्या दाै-याचा मनसेची पुनर्बांधणी हा उद्देश असला तरी या दाै-याकडे पक्षाच्या निम्म्या नगरसेवकांनी पाठ फिरवली. मनसेच्या १६-१७ नाखुश नगरसेवकांना खूश करण्यासाठी काेणते पाऊल उचलले जाते याकडे लक्ष लागले आहे.

कच-यापासून वीज, मलबा उचलण्यासाठी निविदा
कच-यापासूनवीजनिर्मितीसाठी लवकरच प्रक्रिया पूर्ण हाेईल. त्यादृष्टीने िनविदा काढण्याच्या सूचना दिल्याचे राज यांनी सांगितले. दरम्यान, शहरात विविध ठिकाणी टाकला जाणारा मलबा उचलण्यासाठी कंत्राट िदले असून, तुम्ही फाेन केला तर संबंधित कंपनीचा ट्रक येऊन मलबा घेऊन जाईल, असेही त्यांनी सांगितले. हे काम दाेन वर्षांपूर्वीच हाेणार हाेते. मात्र, पालिकेतील अधिका-यांनी प्रतिसाद दिल्याने त्यास विलंब झालयाची खंत त्यांनी व्यक्त केली.

नवीन टीमबाबत राज समाधानी
स्थापनेपासूनपक्षासाेबतच्या शिलेदारांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर आता पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करणा-या राज यांनी नवीन टीमबाबत समाधान व्यक्त केले. पहिल्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने वेगात ही टीम काम करीत असल्याचे राज यांनी पत्रकारांसमाेर सांगितले. राज यांनी जाहीरपणे पाठ थाेपटल्यामुळे पदाधिकारीही सुखावल्याचे चित्र हाेते. दरम्यान, राज यांनी पदाधिका-यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे लपून राहिले नाही.

उड्डाण पुलाखालच्या सुशाेभीकरणाला लाल कंदील
शहरातूनजाणा-या उड्डाणपुलाखालील जागा बागा अन्य माध्यमातून सुशाेभित करण्याचा मनसेचा प्रयत्न हाेता. राज यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून उड्डाणपुलाखालील जागा विकासासाठी पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली हाेती त्यावर गडकरींनी हिरवा कंदील दाखवला हाेता. ही जागा महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी हालचाली सुरू हाेत्या. मात्र, त्यास ब्रेक लागल्याचे चित्र असून, खुद्द राज यांनीही तसेच संकेत दिले. दरम्यान, संबंधित कंपनीकडून शहरातील दाेन माेठ्या प्रकल्पांना खासगीकरणातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यामुळेही उड्डाणपुलाखालील सुशाेभीकरणाच्या कामाला प्रतिसाद दिला जात नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.