आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासींसाठी स्वतंत्र राज्य करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशभरात अठरा काेटी अादिवासी असून, केंद्र राज्य सरकार त्यांच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत अाहे. अादिवासींना त्यांचे हक्क अाणि अधिकार िमळवून देण्यासाठी सरकारकडे स्वतंत्र राज्याची मागणी करणार असल्याची माहिती अखिल भारतीय अादिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांनी िदली. कालिदास कलामंदिर येथे शुक्रवारी झालेल्या अादिवासी प्रबाेधन मेळाव्यात ते बाेलत हाेते.
या वेळी व्यासपीठावर झारखंडच्या माजी मंत्री गीताश्री अाेराव, परिषदेच्या महिला अध्यक्षा ऊर्मी मार्काे, अामदार वैभव िपचड, विदर्भाचे अध्यक्ष अॅड. माणिराम मडावी, वर्ध्याचे अध्यक्ष नामदेव मेश्राम, गडचिराेलीचे अध्यक्ष घनश्याम मडावी, माजी अामदार पांडुरंग गांगड शिवराम झाेले, वसंतराव नाईक, सूर्यकांत उईके अादी उपस्थित हाेते. पिचड पुढे म्हणाले, मे महिन्यात नागपूर येथे परिषदेचे महासंमेलन हाेणार अाहे. त्यात अादिवासींसाठी स्वतंत्र राज्य करण्याची मागणी सरकारकडे केली जाईल. अादिवासींना वनवासी म्हटले जाते. मात्र, अादिवासी वनवासी नसून, मूळ िनवासी अाहेत. शासनाने आदिवासींसाठी पेसा कायदा मंजूर केला अाहे. परंतु, कायद्याप्रमाणे अजूनही अादिवासी मुलांना नाेकऱ्या मिळत नाहीत. आमच्या जमिनी अधिग्रहित करून त्यावर प्रकल्प साकारले जात अाहेत. त्यामुळे अादिवासी बेघर भूमिहीन हाेत अाहेत. क्रांतिकारी िबर्सा मुंडा यांना अजूनही भारतरत्न मिळालेला नाही. हा १८ काेटी अादिवासींचा अपमान अाहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या वेळी क्रीडा, साहित्य, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा मेळाव्यात गाैरव करण्यात अाला.
कढीपत्ता बनू नका
कढीलाचव अाणण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जाताे. मात्र, कढी खाताना कढीपत्ता काढून फेकून दिला जाताे. अगदी तशीच अवस्था अाजच्या अादिवासी नेते पुढाऱ्यांची झाली असून, स्वार्थ पूर्ण झाला की साइड ट्रॅक केले जात अाहे. त्यामुळे नेते-पुढाऱ्यांनी कढीपत्ता बनता िमरची बनून अापल्या हक्कांसाठी सरकारच्या डाेळ्यात पाणी अाणावे, असा सल्लाही या वेळी िपचड यांनी दिला.
मुंबईचे पाणी अडवू...
धनगरसमाजाला अारक्षण द्या, मात्र, आदिवासींच्या अारक्षणाला धक्का लावू नका. तसे झाल्यास राज्य सरकारच्या विराेधात अादिवासी रस्त्यावर उतरतील, असा इशारा पिचड यांनी िदला. दरम्यान, तानसा, वैतरणा यासारखी धरणे अादिवासी क्षेत्रात अाहेत. जर सरकारने अामच्या अारक्षणाला धक्का लावला, तर या धरणातून मुंबईला जाणारे पाणी अडवून तीव्र अांदाेलन छेडू, असा इशाराही िपचड यांनी िदला.