आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहर बससेवा सुरळीत करण्याची मागणी, मनविसेचे बाेंबाबाेंब अांदाेलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वाढत्या तोट्याचे कारण देत एसटी महामंडळाकडूून टप्प्याटप्प्याने शहर बस बंद केल्या जात आहेत. या प्रकारामुळे ग्रामीण तसेच शहरातील शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत अाहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेत एसटी महामंडळाने बंद केलेल्या बसफेऱ्या तातडीने सुरू कराव्या या मागणीसाठी मंगळवारी (दि. २८) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने एसटीच्या विभागीय कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर बससेवा सुरळीत करा, अन्यथा खुर्च्यां खाली करा, परिवहन मंत्री दिवाकर रावते हायहाय अशा जोरदार घोषणा देण्यात अाल्या. 

 

एसटी महामंडळाला शहर बससेवेमुळे दर महिन्याला दोन ते तीन कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घ्यावी असे पत्र एसटीने दिले अाहे. मात्र याबाबत निर्णय झाल्याने एसटीकडून शहर बससेवा टप्प्याटप्प्याने बंद केली जात अाहे. यामुळे २३० पैकी सध्या १२५ बस शहरात धावत अाहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह पासधारक विद्यार्थ्यांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मनविसेच्या वतीने मंगळवारी एसटीच्या विभागीय कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नाशिक डेपो मधील बसेसवर चढत परिवहन मंत्री, विभागीय नियंत्रकांच्या विरोधात घोषणा दिल्या. 

 

यानंतर विभागीय नियंत्रकाच्या कार्यालयात ठिय्या मांडला. मात्र विभागीय नियंत्रक दौऱ्यावर असल्याचे कळल्याने आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले त्यांनी विभागीय नियंत्रकाच्या खुर्चीला निवेदन चिकटविण्याचा निर्णय घेतला, एसटीच्या ०००० अधिकाऱ्यांनी ऱ्यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेवून बंद केलेल्या बसेस तातडीने सुरू केल्यास मनिवेसेच्या वतीने एसटी प्रशासनाच्या विरोधात खळखट्याक करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे, संदीप भवर, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, शहराध्यक्ष शाम गोहाड, दीपक चव्हाण, कौश पाटील, तुषार भंदुरे, अमर जमधडे, उमेश भोई, सौरभ सोनवणे,प्रसाद घुमरे, प्रशांत बारगळ, किरण बेलेकर, शशिकांत चौधरी, उमेश भोई, विशाल पुरबे आदी पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते. 

 

दोन दिवसांनी शिष्टमंडळ भेट घेणार 
मनविसेचे शिष्टमंडळ दोन दिवसांनतर विभागीय नियंत्रकाची भेट घेणार आहे. यानंतरही जर शहरातील बससेवा सुरळीत झाल्यास मनविसेच्या आंदोलन करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...