आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात रिसर्च लॅबसाठी टीसीएसला साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जगप्रसिद्ध टीसीएस कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. चनरा यांना नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने नाशिक भेटीचे निमंत्रण दिले. टीसीएसने आपली संशोधन प्रयोगशाळा नाशिकमध्ये उभारावी याकरिता निमाने (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) टीसीएसकडे साकडे घातले असून, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनानंतर बोस्टन एमआयटीच्या दौऱ्यावर शहरातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि उद्योजकांची टीम गेली होती, जी आता परतली आहे. शुक्रवारी निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, माजी अध्यक्ष मनीष कोठारी आणि व्हिनस वाणी यांनी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस)चे संचालक आणि सीईओ एन. चंद्रशेखरन यांना या संशोधन प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी साकडे घातले.

बोस्टन एमआयटीच्या इनोव्हेशन सेंटर लॅबमध्ये नाशिकमध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल नामांकित पाचशे कंपन्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रशासन आणि कुंभथॉन टीमने या सोहळ्यात केलेल्या कामांची प्रशंसा केली.

देश देशपांडे यांना नाशिक भेटीचे निमंत्रण
देशपांडेफाउंडेशनचे संस्थापक देश देशपांडे यांनाही नाशिक भेटीचे निमंत्रण देण्यात आले असता त्यांनी जानेवारी २०१६ मध्ये नाशिकला भेट देण्याचे निश्चित केल्याची माहिती निमाचे मनीष काेठारी यांनी दिली.