आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमेंट उद्योगास मोठी मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भारतीयअर्थव्यवस्थेचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता सिमेंट उद्योगात भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे, असे प्रतिपादन बांधकाम साहित्य चाचणी अधिकारी प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.
येथील महावीर एज्युकेशन सोसायटीच्या श्री महावीर पॉलिटेक्निक काॅलेजात सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात अालेल्या ‘लॅब टेस्टिंग ऑन सिमेंट' या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज बुरड, संस्थेच्या सी.ई.ओ. माया पडवळ उपस्थित होते. प्रा. पाठक पुढे म्हणाले की, बांधकाम करताना सिमेंट हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, उच्च गुणवत्ता असलेले सिमेंट बांधकामासाठी वापरले जाणे गरजेचे अाहे. सिमेंटमधील जैविक आणि रासायनिक घटकांची मूल्यमापन चाचणी होणे अत्यंत आवश्यक असून, त्याचा वातावरण बांधकामावर भविष्यात होणारा परिणाम लक्षात घेऊन चांगल्या प्रतीच्या सिमेंटची निवड करणे हितकारक असल्याचेही ते म्हणाले.

यानंतर श्री महावीर पॉलिटेक्निकच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख मेघा अनंतवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लॅब टेस्टिंगविषयी माहिती िदली. प्रा. अक्षय ठाकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. नीलेश तुपे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. सतीश कदम, अक्षय ठाकरे, पराग भोई, सचिन कजबे अादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या इंजिनिअरिंग िवभागातील सर्व विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

बांधकाम व्यावसायिकांमध्ये लोकाभिमुखता हवी
भारतीयअर्थव्यवस्थेचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असून, त्यात क्रांतिकारक बदल झाले आहेत. वाढत्या नागरीकरणाप्रमाणे हे बांधकाम क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचे मोठे आव्हान देशासमोर आहे. बांधकाम व्यावसायिकांत आज आधुनिकतेचे वातावरण असून, या आव्हानाला सामोरे जाताना औद्योगिकतेच्या दृष्टीने बांधकाम व्यावसायिकांमध्ये लोकाभिमुखता तसेच समाजसेवेचा ध्यास आवश्यक आहे. सध्याचा विकास लक्षात घेता, सिमेंट उद्योगात भविष्यात याहून मोठ्या प्रमाणावर भरभराट होईल, असा विश्वास यावेळी प्रा. पाठक यांनी बाेलून दाखवला.