आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्हसरूळला एकाच इमारतीतील आठ अतिक्रमणे जमीनदाेस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(म्हसरूळ येथील स्नेहनगर परिसरातील देवल पार्क इमारतीतील अतिक्रमित बांधकाम गुरुवारी तोडताना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी.)
नाशिक- महापालिकेने शहरातील रस्त्यांबराेबरच आता इमारतींतील खासगी अतिक्रमणे काढण्यावरदेखील लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच एक भाग म्हणून म्हसरूळ येथील स्नेहनगर परिसरातील देवल पार्क या इमारतीतील आठ अतिक्रमित बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली.

याच इमारतीतील एका रहिवाशाने अनधिकृत बांधकामांची तक्रार केली होती. त्यात प्रामुख्याने वाहनतळाच्या जागेवर पक्के शेड बांधणे, टेरेसची जागा बंदिस्त करून खोलीप्रमाणे वापर करण्याचे प्रकार होते. जवळपास इमारतीतील बहुतांश रहिवाशांचे अतिक्रमण असल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी लावून बांधकाम काढले.

सुरुवातीला विरोध, नंतर शांतता
महापालिकेच्या पथकाने प्रामुख्याने सकाळी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यावर लोकांनी विरोध सुरू केला. मात्र, जवळपास ३० पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असल्यामुळे त्यांचा हळूहळू विरोध मावळला.
बातम्या आणखी आहेत...