आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ समर्थनार्थ माेर्चास अनेकांची मदत, जनजागृतीसाठी रॅली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी ईडीच्या कोठडीत अाहेत. शासनाने सूडबुद्धीतून केलेल्या अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या सुटकेसाठी भुजबळ समर्थकांच्या वतीने आॅक्टोबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार अाहे. या माेर्चाला तपाेवनातील जनार्दन स्वामी अाश्रमापासून सुरुवात हाेणार अाहे. लाखाेंच्या संख्येने नागरिक या माेर्चास उपस्थित राहतील, असे चित्र रविवारी माेर्चाच्या नियोजनासंदर्भात जयशंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे झालेल्या बैठकीत पाहायला मिळाले. याप्रसंगी अनेकांनी राेख रक्कम माेर्चाच्या नियाेजनासाठी जाहीर केली.

भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेला असून, ताे संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय असल्याने त्यांच्या समर्थनार्थ माेर्चा काढण्यात येणार अाहे. हा मोर्चा कुठल्याही जाती, धर्माविरुद्ध नसून केवळ ओबीसी भुजबळ समर्थकांचा हा मोर्चा असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले. बैठकीत या मोर्चात मोठ्या ताकदीने सहभागी होऊन निषेध नोंदविण्याचे देखील ठरविण्यात आले. भुजबळांनी खूप काम उभे केले. मात्र, आज त्यांच्यावर अन्याय झालेला असून त्यांचा छळ सुरू आहे. राजकीय, सामाजिक षङ‌्यंत्र किंवा ओबीसींचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असल्याचा सूर बैठकीत निघाला. मोर्चा एका समाजाचा अथवा पक्षाचा नसून भुजबळ समर्थक ओबीसी समाजाचा असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मोर्चासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस मेळाव्याचे स्वरूप : भुजबळसमर्थक अाेबीसी समाजातील नेते-पदाधिकाऱ्यांसाठी या बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. मात्र, अडीच ते तीन हजार लाेक येथे उपस्थित राहिल्याने बैठकीला मेळाव्याचे स्वरूप अालेले पाहायला मिळाले.

बैठकीस लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन साेनवणे, शैलेश सूर्यवंशी, अरुण नेवासकर, बाळासाहेब कर्डक, मधुकर जेजूरकर, पंढरीनाथ थोरे, बाजीराव तिडके, राकाशेठ माळी, नगरसेविका सुनीता शिंदे, के. एम. बनकर, अंबादास खैरे, बालम पटेल, सुभाष शिंदे, सुनील सूर्यवंशी, राजेंद्र अाहेर, वाळूमामा शिंदे, संजय सूर्यवंशी, संदीप खैरे, राजेंद्र खैरे, महेश बाळसराफ, राजेंद्र जाधव, नवनाथ सूर्यवंशी अादी उपस्थित होते.

पाच हजार वाहनांचे करण्यात अाले नियाेजन
जिल्हाभरातूनलाेक या माेर्चात सहभागी हाेणार असल्याने अार्थिक मदतीचा हातही हवा या हेतूने अानंदवलीतील त्र्याहत्तर वर्षीय मुक्ताबाई माेटकरी या अाजींनी अकरा हजार रुपयांची मदत दिली. त्यानंतर त्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देताना बैठकीत उपस्थित असलेल्या मान्यवर कार्यकर्त्यांनी रोख वस्तू स्वरूपात मदत जाहीर केली. माेर्चाकरिता येणाऱ्यांसाठी पाच हजार वाहनांचे नियाेजन यावेळी करण्यात अाले अाहे. राज्यभरात बैठका घेऊन जनजागृती करत मोर्चात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणी बैठका प्रचार रॅलीदेखील काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

छायाचित्र: पंचवटीतील तपाेवनातील जयशंकर फेस्टिव्हल लाॅन्समध्येे झालेल्या भुजबळांच्या समर्थनार्थ बैठकीस उपस्थित असलेले समर्थक. याप्रसंगी अनेकांनी मेळाव्यासाठी अार्थिक सहाय्य घाेषित केले.
बातम्या आणखी आहेत...