आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेतील कर्मचार्‍याकडून अपहार; मृत महिलेच्या खात्यातील काढले पैसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- इगतपुरी शहरातील राष्ट्रीयीकृत देना बँकेत एका मृत महिलेच्या खात्यावरून परस्पर लाखो रुपये एटीएमद्वारे काढून घेण्यात आले आहेत. बँकेतील संगणक विभागाच्या मदतनिसाने हा अपहार केल्याची कबुली पोलिसांना दिली असून बँकेच्या व्यवस्थापकाने इगतपुरी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

इगतपुरी शहरातील जुना मुंबई नाका महामार्गावर देना बँकेची शाखा आहे. या बँकेत मृत अनुसयाबाई गोडे यांचे बचत खाते आहे. या बचत खात्यावर बँकेत लाखो रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट आहेत. तसेच पेन्शनचीही रक्कम होती. बँकेतील संगणक विभागातील मदतनीस अनिल लक्ष्मण सकट याने 15 जानेवारी 2013 ते 28 मार्च 2014 या कालावधीत व्यवस्थापक व कर्मचार्‍यांच्या संगणक सिस्टिममध्ये बँकेची परवानगी न घेता परस्पर नोंदी करून गोडे यांच्या फिक्स्ड डिपॉझिटचे पाच लाख 99 हजार 349 रुपये गोडे यांच्या खात्यावर वळवले. त्याचप्रमाणे पेन्शन खात्यावरील 6 लाख 11 हजार 536 रुपये बचत खात्यात जमा केले. दरम्यान, 14 महिन्यांच्या कालावधीत डेबिट कार्डच्या मदतीने विविध एटीएम केंद्रांवरून एकूण 12 लाख 10 हजार 885 रुपये काढले. दरम्यान, गोडे यांच्या पेन्शन खात्यावरील लाखो रुपये अचानक काढून घेतले असल्याचे व्यवस्थापक रोहित कुमार झा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना कर्मचार्‍यांना विचारले असता त्यांनीही याविषयी माहिती नसल्याचे सांगितले. झा यांना संगणक मदतनीस सकट याच्यावर संशय आला. त्यांनी याविषयी सकटला विचारले असता त्याने टोलवाटोलवी केली.

फुटेजने बिंग फुटले
कॅमेर्‍याचे फुटेज बँकेकडून मागवले असता सकट हा खात्यावरील एटीएमच्या साहाय्याने पैसे काढताना दिसून आला. व्यवस्थापकांनी सकटला विचारले असता त्याने ही रक्कम स्वत:च्या फायद्याकरिता काढून घेतली असल्याचे सांगत पैसे परत करतो असे सांगून दोन चेक त्याने बँकेला गत महिन्यात दिले होते. मात्र, त्याने पैसे जमा केलेच नाही.