आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात कावीळचे २३ रुग्ण डेंग्यूचे १५, तर कावीळचे २३ रुग्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात डेंग्यूचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून, गेल्या १६ दिवसांत डेंग्यूचे तब्बल ८२ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या दप्तरी आहे. जानेवारीपासून आजतागायत ६९७ डेंग्यूसदृश रुग्ण शहरात आढळून आले आहेत. त्यातील ३१८ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी सांगितले.

शहरात डेंग्यूचा फैलाव वाऱ्याच्या वेगाने होत आहे. या आजाराने यापूर्वी चौघांचा बळी घेतला आहे. त्यात मनसेच्या नगरसेविका अर्चना जाधव यांचे पती संजय जाधव यांचाही समावेश आहे. डेंग्यूचा वाढता फैलाव लक्षात घेता महापालिका प्रशासनाने गृहभेटी, जनजागृती, साठवलेल्या पाण्याची तपासणी, टायर तपासणी, औषध फवारणी, धूरफवारणी यांसारख्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या पातळीवरूनही जनजागृती घडवून आणण्यात येत आहे. दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून डेंग्यूविषयीची माहिती दिली जात आहे. मात्र, तरीही डेंग्यूचा फैलाव रोखण्यात अपयश येत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरपासून आजपर्यंत तब्बल ८२ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या अकरा महिन्यांत शहरात ३१८ लोकांना डेंग्यू आजाराने पछाडल्याचे निष्पन्न झाले आहे.

पावसाचेपाणीही साफ करा : दोन दिवसांतील पावसामुळे डेंग्यूचा फैलाव वाढेल, हा गैरसमज आहे. परंतु, या पावसाचे पाणी जर टेरेस, गॅलरी वा झाडांच्या कुंड्यांमध्ये साचले तर मात्र त्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते. यासाठी नागरिकांनी पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. डेंग्यूला रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी सांगितले.

काळजी घ्यावी
दरम्यान,गेल्या महिन्याभरात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दहा हजार ३४१ जणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत काविळीचे - २३ तर डेंग्यूचे १५ रुग्ण आढळून आले अाहेत.
खासगी रुग्णालयात असंख्य रुग्ण
पालिकेच्या लेखी अकरा महिन्यांत डेंग्यूच्या ३१८ रुग्णांची नाेंदणी झाली असली तरीही या काळात त्यापेक्षा िकतीतरी अधिक लाेकांना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे अाले अाहे. अनेक खासगी रुग्णालयांतील डेंग्यूच्या रुग्णांची नाेंदणी मात्र पालिकेत करण्यात अालेली नाही.
१६ दिवसांत डेंग्यूचे ८२ रुग्ण
गेल्या महिन्याभरात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कावीळचे २३, डेंग्यूचे १५ रुग्ण दाखल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

जुने नाशिक, वडाळागाव, द्वारका परिसरात वारंवार दूषित पाणीपुरवठा होत आहे. डॉ. हुसेन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी मंगळवारी पूर्व विभाग सभेत यांनी आतापर्यंत २३ नागरिकांना कावीळ, तर १५ जणांना डेंग्यू झाल्याचे सांगितले. वातावरणातील बदलाने साथीच्या विकारांत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. खोकला, डोकेदुखी, ताप, पोट छातीवर सूज अशा विकारांच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याची माहिती डॉ. भंडारी यांनी दिली. जलकुंभामध्ये ब्लीचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने विविध विकारांचे रुग्ण वाढले आहेत. धूरफवारणी होतच नसल्याने विविध विकारांच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. हिवताप, उलट्या, नाका-तोंडातून रक्त येणे, त्वचेवर डाग पडणे, रक्तदाब कमी होणे यांसारख्या विकारांच्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी असली, तरी धूरफवारणी गरजेची असल्याचे नागरिकांचे मत आहे.

अजून महिनाभर प्रभाव
^गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता डेंग्यूचा प्रभाव अजून एक महिना असेल अशी शक्यता आहे. हा आजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी पॅनिक होता स्वच्छतेवर भर द्यावा. डॉ.बी. आ र. गायकवाड, वैद्यकीयअधीक्षक, पालिका