आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूचा धोका खोलवर, स्वच्छता मात्र वरवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - शहरपरिसरातील डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रभाग सभापती उत्तम दोंदे विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांनी विभागात पाहणी दौरा केला. महापालिका कर्मचायांनी डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांची पत्रके वाटत जनजागृती केली.

अनेक नागरिक पेलिकन पार्क येथे कचरा आणून टाकतात. त्या ठिकाणी उघड्या नाल्यावर औषध फवारणी करण्यात आली. सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्वछता मोहीम राबविली. या वेळी स्वछता निरीक्षक विठ्ठल पवार, मलेरिया निरीक्षक नदीम पठाण आदींनी संपूर्ण परिसराची माहिती घेत कर्मचाऱ्यांकडून औषध फवारणी करून घेतली. संपूर्ण आठवडाभर ही मोहीम राबविली जाणार आहे.

आमदारसीमा हिरेंकडून काळजी घेण्याचा सल्ला
दरम्यान,डेंग्यूचा बळी ठरलेले चेतनानगर येथील जितेंद्र कुलकर्णी यांच्या घरी जाऊन आमदार सीमा हिरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमदार हिरे यांनी कुलकर्णी यांच्या सोसायटीतील नागरिकांशीही संवाद साधला. परिसरात जाऊन स्वच्छतेची पाहणी केली नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुलकर्णी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पत्नीलाही डेंग्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आमदार हिरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी डॉ. मंजूषा दराडे, अलका आहिरे, डॉ. अमोल पाटील, साहेबराव आव्हाड आदी होते.

जनजागृती करणार
*महापालिकेच्यावतीने डेंग्यू रोखण्यासाठी सर्व उपाययोजना राबवित आहोत. नागरिकांची जनजागृती महत्त्वाची आहे. सर्व आरोग्य मलेरिया विभागाला आदेश देण्यात आले आहेत. आर.आर. गोसावी, विभागीयअधिकारी

धूर फवारणी करणार
*संपूर्णसिडको विभागात धूर फवारणी केली जाणार आहे. मोठ्या वाहनांतून ही धूर फवारणी केली जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही कमतरता ठेवणार नाही. उत्तमदोंदे, सभापती,सिडको
डेंग्यूचाबळी ठरलेले चेतनानगर येथील जितेंद्र कुलकर्णी यांच्या घरी महापौर अशोक मुर्तडक नगरसेविका अर्चना जाधव यांनी भेट देऊन कुलकर्णी कुटुंबीयांचे सांत्वन केले. कुलकर्णी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, अशी घटना घडू नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन महापौरांनी केले.
डेंग्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डेंग्यूबाबत प्रबोधन करताना परिसरातील नागरिकांना स्वछतेचे आवाहनही त्यांनी केले. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. याबाबत प्रशासनच्या वतीने स्वछता मोहीम, धूरफवारणी जनजागृती केली जात असल्याची माहिती महापौरांनी दिली. या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.