आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूच्या संशयित बळींची करा उच्चस्तरीय चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसे नगरसेविकेच्या पतीचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेने आता प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच डेंग्यूची नेमकी कारणे शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्य उपसंचालकांसारख्या तटस्थ उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत शहरातील डेंग्यूच्या संशयित बळींची चौकशी करण्याची मागणी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली आहे. याबरोबरच पालिकेची यंत्रणा दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठ दिवसांत डेंग्यूच्या चार संशयितांचा मृत्यू झाला असून, या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शुक्रवारी (दि. १४) आरोग्य वैद्यकीय विभागाची बैठक घेतली. यात शहरात धुरळणी औषध फवारणी योग्य पद्धतीने करावी, सफाई कर्मचारी वेळेवर हजर राहात नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, २२ धूरफवारणी यंत्रे कार्यान्वित करावी त्यासाठी कर्मचारी नसतील तर कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नेमणूक करा, अशा सूचना त्यांनी केल्या.
खासगीरुग्णालयांवर पालिकेचा अंकुश : कायद्यातीलतरतुदीप्रमाणेच खासगी रुग्णालयांना रुग्णांची माहिती कळवण्याचे बंधन असून, वैद्यकीय विभागाने त्याप्रमाणे रुग्णालयांकडून माहिती मागवावी जे माहिती पाठवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशाही सूचना केल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यासाठी वैद्यकीय विभागाला एक ई-मेल सुरू करण्याचे आदेश दिले. खासगी रुग्णालयाकडून माहिती आल्यास किमान प्रत्येक विभागातील आजाराचा ट्रेण्ड काय आहे, हे कळण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरशनिवारी शहरात कोरडा दिवस : डेंग्यूचाप्रसार करणाऱ्या डासांची वाढ अंडी दिल्‍यापासून सात दिवसांत होते. या पार्श्वभूमीवर दर सात दिवसांनी प्रत्येक घरात कोरडा दिवस पाळला गेला तर डेंग्यूवर नियंत्रण मिळवता येईल, अशी आशा आयुक्तांनी व्यक्त केली. त्यासाठी दर शनिवारी शहरात कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

पालिकेने स्वत:ची प्रयोगशाळा उभारावी
डेंग्यूच्यावाढत्या प्रमाणाला पालिकेची यंत्रणा जबाबदार असून, शहरात धूर औषध फवारणी योग्य पद्धतीने झालेली नाही. संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज आहे. मुळात डेंग्यूच्या आजाराचे निदान करण्यासाठी येथे चांगली प्रयोगशाळा नसल्याने डेंग्यूच्या संशयितांचे रक्तनमुने घेतल्यावर आठ-आठ दिवस अहवाल मिळवण्यातच जातात. त्यामुळे पालिकेने स्वत:ची प्रयोगशाळा सुरू करावी. जेणेकरून वेळेत निदान उपचार होईल. सुधाकरबडगुजर, विरोधीपक्षनेता
मोकळ्या भूखंडांवर डबकी साचल्यास दंड
शहरातीलमोकळ्या भूखंडावर डास उत्पत्तीस कारणीभूत ठरणारे गाजरगवत, पाण्याची डबकी साचली असून, त्यांच्यावर काय कारवाई केली, याबाबत आयुक्तांनी विचारणा केल्यावर आरोग्याधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवल्याचे सरळधोपट उत्तर दिले. त्यावर आयुक्तांनी निव्वळ नोटीस पाठवू अन्यथा कारवाई करू, असा फुसका दम ऐवजीदंडात्मक कारवाई करा, असे आदेश दिले.