आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फवारणी अन‌् धुरळणी बंद; बसला डेंग्यूचा डंख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्यावर्षी नाेव्हेंबरमध्ये डेंग्यूमुळे नगरसेविकेच्या पतीसह अनेकांनी गमावलेले प्राण अाराेग्य विभागाकडून झालेल्या दुर्लक्षाची अाठवण अगदी ताजी असताना यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीच शहरात डेंग्यूचे चार संशयित अाढळल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त हाेत अाहे. त्यातच दहा दिवसांपासून शहरात अळीनाशक फवारणी धुरळणीच बंद झाली असल्यामुळे डेंग्यूचा फैलाव वाढण्याची भीती निर्माण झाली अाहे.

जेमतेम नऊ महिन्यांपूर्वीच डेंग्यूने शहराला तडाखा दिला हाेता. डेंग्यू संशयितांची संख्या हजारापर्यंत पाेहचली हाेती. प्रत्यक्षात बाधा झालेले रुग्ण शंभराहून अधिक हाेते. प्रामुख्याने पावसाळ्यात त्यानंतरच्या कालावधीतही पेस्ट कंट्राेल ठेक्याकडे झालेले दुर्लक्ष, अळीनाशक धूर फवारणीकडे झालेला काणाडाेळा अादी कारणांमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचेही स्पष्ट झाले हाेते. जानेवारीपर्यंत डेंग्यूचे रुग्ण अाढळतच हाेते.

यंदाही महापालिकेचा अाराेग्य विभाग ढिम्मच असून पावसाळा सुरू झाल्यानंतरही अळीनाशक फवारणी धुरळणी हाेत नसल्याने डेंग्यू डाेके वर काढण्याची शक्यता अाहे. या अाठवड्यात डेंग्यूचे सात संशयित रुग्ण अाढळले असून, त्यात सातपूरमधील दाेन, एक अागरटाकळीचा तर एक गांधीनगर परिसरातील अाहे. सिन्नर, लासलगाव साक्री येथील तीन रुग्ण अाहेत.

अतिरिक्तअायुक्तांकडून कानउघडणी
पेस्टकंट्राेलच्या ठेक्याला स्थायी समितीने मुदतवाढ िदली असून, केवळ ठरावाच्या अनुषंगाने ठेकेदाराला अादेश नसल्यामुळे धुरळणीचे कामकाज बंद ठेवले गेले. ही बाब अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांच्यापर्यंत पाेहचल्यानंतर त्यांनी अाराेग्यधिकारी डाॅ. विजय डेकाटे, सहाय्यक अाराेग्याधिकारी सचिन हिरे यांची चांगलीच कानउघडणी केली. ‘फवारणीचे काम प्रशासकीय कारणास्तव काम बंद ठेवले, हे उत्तर चुकीचे असून ठेकेदाराला काम करण्याबाबत सूचना का केल्या नाही,’ असा सवालही त्यांनी केला. अत्यावश्यक बाब असल्यामुळे फवारणी सुरू ठेवून माेबदला कार्याेत्तर मंजुरीद्वारे दिला असता किंवा प्रशासकीय अधिकार वापरून विशेष बाब म्हणूनही मान्यता देता अाली असती, असे सुनावत यापुढे एक दिवसही फवारणी बंद राहिल्यास तुम्हाला जबाबदार धरू, असेही फटकारले. पेस्ट कंट्राेलचा नवीन ठेका देण्याची कारवाई त्वरित करावी, तसेच संबंधित कमी दराच्या ठेकेदाराशी तडजाेड करून ठेका निश्चित करावा, असेही सांगितले. ठेक्यातील एकाही अटी-शर्थींचे उल्लंघन झाले तर जास्तीत जास्त दंड करा, असेही अादेश साेनवणे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

घाबरू नका, डेंग्यूवर मात शक्य
यंदाहीडेंग्यू ताेंड वर काढण्याची भीती असली तरी, साध्या उपायांद्वारे अाणि याेग्य दक्षता घेतल्यास त्यावर सहज मात करता येईल. डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस डासाला काळ्या शरीरावरील पांढऱ्या पट्टयांमुळे सहज अाेळखता येते. या डासाची उत्पत्ती साचलेले पाणी पाण्याशी संबंधित साठवणीच्या ठिकाणाजवळ हाेते. प्रामुख्याने फुटके डबे, बाटल्या, फेकलेल्या बादल्या, राेपांच्या कुंड्या, नारळाच्या करवंट्या, मातीची भांडी, झाडातील पोकळ्या, खराब टायर अशा ठिकाणी ती हाेते. तेथे पाणी साचून त्यात एडीस डास अंडी घालते. या पार्श्वभूमीवर अशा निरूपयाेगी साहित्याची विल्हेवाट लावली, पाणी साठवणुकीशी संबंधित ठिकाणांची ठराविक दिवसांनी स्वच्छता केली तर डेंग्यू उत्पत्तीला निश्चित लगाम बसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे अाहे.

जूनमध्येच १९ संशयित
जूनमध्येचडेंग्यूचे १९ रुग्ण अाढळले हाेते. त्यापैकी अाठ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले हाेते. त्यानंतरही अाराेग्य विभागाने फवारणीबाबत याेग्य ती कारवाई केल्यामुळे अाता साथ भडकण्याची भीती वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...