आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षणात अाढळल्या १९० घरांत डेंग्यूच्या अळ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे तब्बल २१५ रुग्ण अाढळल्यानंतर प्रतिबंधात्मक माेहिमेसाठी जागे झालेल्या महापालिकेने ७०३० घरांना भेटी देऊन पाहणी केली असता, त्यापैकी १९० घरांत डेंग्यूच्या अळ्या अाढळून अाल्या. ९७२७ पाणीसाठे तपासल्यानंतर त्यात २४० पाणीसाठ्यातही अळ्या सापडल्यामुळे त्या नष्ट करण्यात अाल्या.
दाेन महिन्यांपासून डेंग्यूने धुमाकूळ घातला असून, अाराेग्य विभाग ढिम्म असल्याने साथराेग पसरल्याचा अाराेप नगरसेवकांनी केले. सप्टेंबरमध्ये डेंग्यूने दाेनशेचा अाकडा पार केल्यानंतर अाराेग्य विभागाची धावपळ सुरू झाली अाहे. अाराेग्य विभागाने अाॅक्टाेबरपासून शहरात स्वच्छता माेहीम हाती घेतली असून, त्याअंतर्गत प्रभाग १३, २०, ३१, ६०, १९, ६१, या प्रभागांत ७०३० घरे महापालिकेने तपासले. त्यापैकी १९० घरांत डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. ६१ बांधकामांना भेटी दिल्या. येथे पाणी तुंबता कामा नये अशी ताकीद दिली. ६१ गटसभा घेऊन डेंग्यूविषयी जनजागृती केली. १० टायर दुकान भंगार दुकानांना भेटी दिल्या. १९ इमारतींच्या तळाला साचलेल्या पाण्याबद्दलही तंबी दिली. अाता सिडकाेत माेहीम सुरू केली जाईल शेवटी पंचवटी विभाग घेतला जाणार अाहे.

शिक्षक, विद्यार्थी करणार जागृती
पालिकेचा अाराेग्य विभाग डेंग्यूबाबत जागृती करण्यात अपयशी ठरल्यानंतर अाता पालिका शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार अाहे. अाॅक्टाेबर राेजी सर्वांना डेंग्यूबाबत माहिती दिली जाणार असून, त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला पाच घरी जाऊन डेंग्यूबाबत लाेकांना जागृत करण्याची जबाबदारी दिली जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...