आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील डेंग्यू उद्रेकामुळे अाराेग्यमंत्र्यांना भरली धडकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिल्लीतील डेंग्यूच्या बळींमुळे सरकारविराेधात तयार झालेले राेषाचे वातावरण लक्षात घेत राज्य सरकारने नाशिकमधील डेंग्यूच्या उद्रेकाची गंभीर दखल घेतली अाहे. म्हणूनच की काय अाराेग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबत गंभीर दखल घेत डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याचे सहायक संचालक डॉ. कदम यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली अाहे. एवढेच नव्हे, तर डेंग्यूचा प्रादुर्भाव झालेल्या भागात विशेष कृती कार्यक्रम राबवण्यासाठी पथकेही स्थापन केली अाहेत.
गेल्या दाेन वर्षांच्या तुलनेत गेल्या साडेआठ महिन्यांत शहरात १३५७ डेंग्यू संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ५०३ जणांना डेंग्यू झाल्याचे उघड झाले आहे. दिल्लीत डेंग्यू प्रादुर्भावामुळे अाम अादमी सरकारविराेधात राेषाचे वातावरण अाहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही दक्षता घेतली जात असल्याचे उघड झाले अाहे. खुद्द अाराेग्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत चिंता व्यक्त केली अाहे. एवढेच नव्हे तर पुणे येथील आरोग्य सहसंचालक डॉ. जगताप यांनाही नाशिकमधील डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्याचा अादेश दिला अाहे. जगताप यांनी सहाय्यक संचालक डाॅ. कदम यांच्याकडे विशेष निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली असून, त्यांनी शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या दाेन संवेदनशील ठिकाणांना भेट देत उपाययाेजनांचा अाढावाही घेतला.
११अाराेग्य केंद्र अतिसंवेदनशील : ऑगस्टमहिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक १८७ रुग्ण आढळून आले असून, पालिका क्षेत्रातील ३० पैकी ११ शहरी अाराेग्य सेवा केंद्रांतच ११४ डेंग्यूबाधित रुग्ण अाढळल्यामुळे दणका बसला अाहेत. त्यामुळे अाराेग्य केंद्रच अतिसंवेदनशील ठरले अाहेत. त्यात सातपूर विभागातील महाराष्ट्र हौसिंग कॉलनी, संजीवनगर, गंगापूर, सिडकाे, पवननगर, मोरवाडी, कामटवाडे, नाशिक पूर्वत वडाळागाव, भारतनगर, नाशिकरोड, नाशिक पश्चिम विभागात सिव्हिल हाॅस्पिटलमधील केंद्राचा समावेश आहे.

धूरफवारणी करणार
घरभेटीत तापाचे रुग्ण तपासून संशयास्पद रुणांचे रक्तनमुने तपासले जातील. परिसरातील साचलेल्या पाण्यांची ठिकाणे, तसेच डासांच्या अळ्या नष्ट केल्या जातील. आरोग्य पत्रकांचेही वाटप केले जाणार आहे. नवीन बांधकामे, टायर दुरुस्तीची दुकाने, तसेच भंगार दुकानांचीही तपासणी केली जाणार असून, डेंग्यूबाधित भागात घरांमध्येही जंतुनाशक धूरफवारणी केली जाईल.

७२ पथकांमार्फत तपासणी
डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी ७२ पथके तयार करण्यात आली असून, या पथकांमार्फत २९ हजार घरांमधील दीड लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक पथकात दोन कर्मचारी असणार असून, प्रत्येक पथकाला ५० ते ६० घरे तपासण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २३ सप्टेंबर २०१६ पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...