आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात अाैषध फवारणी बंद; डासांचा वाढला प्रादुर्भाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महिना भरापासूनजुने नाशिक परिसरात घंटागाडी अनियमितपणे येत असल्यामुळे तसेच धूरफवारणी आैषध फवारणी होत नसल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. जुने नाशिक भागात एका नागरिकाला डेंग्यूसदृश अाजाराची लागण झाली अाहे, तर अनेक नागरिकांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खडकाळी परिसरातील नागरिकांनी पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या भागातील नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काही महिन्यांपासून जुने नाशिक भागातील प्रभाग क्रमांक २६ मधील त्र्यंबक पोलिस चौकीमागील परिसरात आैषध फवारणी धूरफवारणी केली जात नसल्याची तक्रारी अशाेकनगर येथे डेंग्यूमुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर जाग्या झालेल्या मलेरिया विभागाने डेंग्यू प्रभावित विभागातील १३० नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले अाहेत. पाण्याचा ड्रम्सची तपासणी केली असता चार ते पाच ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या अाढळून अाल्या.

सातपूर परिसरात रुग्ण अाढळून येत अाहेत. डेंग्यूमुळे नुकत्याच एका महिलेचा मृत्यू झाल्याने पालिका प्रशासन खडबडून जागे झाले अाहे. बुधवारी सकाळपासूनच मलेरिया विभागाचे बायाेलाॅजीस्ट डाॅ. राहूल गायकवाड, मलेरीयाचे विभागीय अधिकारी गिरीश चाैधरी, वरीष्ठ क्षेत्रीय कार्यकर्ता सलीम शेख यांच्या पथकाने सावरकरनगर, अशाेकनगर या परिसराची शाेध माेहिम घेऊन पाण्याची साठवणूक केलेल्या ड्रम्सची तपासणी केली असता चार ते पाच ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या अाढळून अाल्या. या सर्व परिसरात अाैषध फवारणी केल्यानंतर सुमारे १३० नागरीकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले अाहेत.

आरोग्य धिकाऱ्यांचेच दुर्लक्ष..
^डासांचा प्रश्नकाही दिवसांचा नव्हे, तर गेल्या काही महिन्यांपासून आहे. खडकाळी भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर डास वाढले आहे की, घरात झाेपणेही कठीण झाले आहे. या समस्यांचे आरोग्याधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही ते याकडे दुर्लक्ष करत आहे. -अस्लम बशीर खान, स्थानिक रहिवासी
प्रतिनिधी | नाशिक
पावसानेपाठ साठवणूक केलेल्या पाण्यात डासाची अळी साचून धाेकेदायक डेंग्यूचा प्रसार हाेत असून, जून महिन्यात डेंग्यूचे तब्बल ६४ रुग्ण अाढळले अाहे. दुसरीकडे महापालिका अद्यापही पाहिजे तशी जनजागृती करण्यात अपयशी ठरली असून, वैद्यकीय विभागही सुस्तच असल्याचेच चित्र अाहे.

अाॅक्टाेबर ते जानेवारी या कालावधीत डेंग्यू नाशिककरांची झाेप उडवताे. मात्र, यंदा डेंग्यूने मे जून या महिन्यात डाेके वर काढले अाहे. नाशिकमध्ये पाणी कपात सुरू अाहे. त्यामुळे पाणी साठवणूक करून ठेवण्याकडे अनेकांचा कल अाहे. दुदैवी बाब म्हणजे अशा साठवणूक केलेल्या शुद्ध पाण्यामुळेच डेंग्यू प्रसारकाची वाढ हाेत असल्यामुळे अायतीच डेंग्यूची उत्पत्तीस्थाने निर्माण झाली अाहेत. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात डेंग्यूचे तब्बल ३४ रुग्ण अाढळूनही वैद्यकीय विभाग सावध झालेला नाही. त्याचा परिणाम जून महिन्यातही कायम असून, जूनमध्ये तब्बल १२० डेंग्यूचे संशयित रुग्ण अाढळले. त्यापैकी १०३ रुग्णांच्या रक्ताचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील ६४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले अाहे. दरम्यान, त्यात शहरातील ५१ तर ग्रामीण भागातील १३ रुग्ण अाहेत. जून महिन्यातील २२ ते २९ या सात दिवसांच्या कालावधीत २७ डेंग्यूबाधित रुग्ण अाढळले त्यात पाच बाह्य भागातील रुग्ण अाहेत.
बातम्या आणखी आहेत...